बाजारगाव : येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडक देणारी बस.  
नागपूर

ट्रकखाली उतरून लघुशंका करणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

धामणा लिंगा/ बाजारगाव (जि.नागपूर) :  गोंडखैरी येथील महिंद्रा कंपनीसमोर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उभ्या असलेल्या कंटेनरला इकॉनॉमिक्‍स येथून दुसऱ्या शिफ्टचे कर्मचारी घेऊन येणाऱ्या खासगी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरच्या पाठीमागे चाकांची हवा तपासणारा चालक गंभीर जखमी झाला; तर खासगी बसमधील सुमारे 18 कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

12 कर्मचारी जखमी, चालकांची प्रकृती गंभीर
बाजारगाव परिसरातील सावंगा गावाजवळील इकॉनॉमिक्‍स कंपनीतून दुस-या शिफ्टचे कर्मचारी घेऊन येणा-या एका खासगी बसने उभा असलेल्या कंटेनरला पाठीमागून जबर धडक दिली.चालकाने महामार्गाच्या बाजूला कंटेनर उभा करून लघुशंकेला खाली उतरला व टायरमधील हवा तपासत होता. दरम्यान, भरधाव येणा-या बसने चालकासह उभ्या कंटेनरला जबर धडक दिली. यात कंटेनरचालक मोहम्मद आरिफ (वय 28, ए.पी. रोड करिअर कार्यालय, गोंडखैरी), बसचालक विजय बाबाराव राऊत (वय 33, प्लॉट क्र.391, चंदननगर पोस्ट हनुमाननगर, नागपूर) गंभीर जखमी झाले.
 

 उपचार सुरू आहेत
29 कर्मचारी होते बसमध्ये बसमधील सुमारे 18 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या बसमध्ये 29 कर्मचारी प्रवास करीत होते. त्यातील 18 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी वाढली व जखमी कंटेनरचालकासह बसमधील जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास मदत करून मिळेल त्या वाहनात उपचाराकरिता वाडी येथील खासगी रुग्णालयात ट्रक व बसच्या चालकांना दाखल करण्यात आले. 18 कर्मचाऱ्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी बाकी कर्मचा-यांवर उपचार करून सुटी देण्यात आली. सहा कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिससूत्रांकडून प्राप्त झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT