ShivSena_Nagpur 
नागपूर

Winter Session: उद्धव ठाकरे नागपूरकडे रवाना; CMपदावरुन पायउतार झाल्यानंतर अधिवेशनात लावणार हजेरी

त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते गोळा झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Assembly Winter Session: मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहे. यासाठी ते नागपूरकडे रवाना झाले असून काही वेळातच विमानतळावर पोहोचणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर विमानतळ परिसरात गर्दी केली आहे. (Maharashtra Assembly Winter Session Uddhav Thackeray going to Nagpur)

वारसा संघर्षाचा अशा आशयाचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून घोषणाबाजीही करण्यात येत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांचा पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली आहे. हिवाळी अधिवेशनात दोन दिवस त्यांचा नागरपूरात मुक्काम असणार आहे. उद्या ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.

नागपूरचा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभा आहे. एकही शिवसैनिक कुठे गेलेला नाही. शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत. शिवसेनेचं हे शक्तीप्रदर्शन आहे. उद्धव ठाकरे जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत त्यांच्यासाठी हे शक्तीप्रदर्शन आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नेते होते खरा शिवसैनिक फक्त उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

हे ही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT