Mahavikas aghadi should fight elections together
Mahavikas aghadi should fight elections together 
नागपूर

महसूल मंत्री थोरात म्हणाले, मराठा आरक्षणाच्या विषयाचे विनाकारण कुणी राजकारण करू नये...

राजेश चरपे

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील महाविकास आघाडीने (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना) एकत्रितपणे लढाव्या, असा मानस कॉंग्रेसचा असल्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबतचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने मिळून लढवावी असा काँग्रेसचा मानस असला तरी याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकींना अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याच्या आदेशावर उत्तर देताना ते म्हणाले की, हा आदेश फडणवीस मुख्यमंत्री असताच काढण्यात आला होता. प्रशासनाकडून त्याची फक्त अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण गंभीर नाहीत. राज्य सरकार न्यायालयात मराठा समाचाजी बाजू प्रभावीपणे मांडत नाही. मराठा आरक्षणाच्या विषयाचे विनाकारण कुणी राजकारण करू नये. यासंदर्भात अशोक चव्हाण चांगले काम करताहेत. सातत्याने बैठका घेताहेत. देशातले नामांकित वकील आपण यासाठी उभे केले आहेत. त्यामुळे विनायक मेटेंनी केलेले आरोप निराधार आहेत.

मराठा प्रश्‍नावर वातावरण दूषीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. मराठा आरक्षणचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. हा निकाल लागल्यावरच मराठा आरक्षणानुसार पद भरती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सारथी संस्थेची जबाबदारी ही काँग्रेसकडेच असून लवकरच नवीन मंत्र्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. विकास ठाकरे, राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. 

सुशांत सिंगवर बोलण्याचे टाळले 
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येणार का? याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला काही अभ्यास नसल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. 

वाळू चोरी रोखण्यातील त्रुटी दूर करणार 
वाळू चोरी रोखण्याबाबत शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. मंत्रीही स्वत: कारवाई करू शकतात. काही चुकीचे होत असल्यास तपासून पाहिले जाईल. काही त्रुटी असल्यास त्या जिल्हाधिकारी दूर करतील, असे महसूल मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले. 

तपासण्या वाढल्याने रुग्ण वाढले 
कोरोनावर निश्‍चितपणे मात करू. कारण धारावीसारखा परीसर आपण कोरोनामुक्त केला आणि जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली गेली. त्यानंतर नागपुरातील मोमीनपुरासारखा परीसरसुद्धा नियंत्रणात आहे. कोरोनाच्या सर्वाधिक तपासण्या महाराष्ट्रातच होत आहेत. त्यामुळे रुग्ण समोर येत आहेत. यामुळे हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होईल. 

वीज धारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न 
कोरोनाच्या काळात वीज देयकाचा जास्तीचा भार पडलेल्या ग्राहकांना वीज देयकात सवलत देण्याचा विचार आहे. त्यासंदर्भात येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT