BJP Logo भाजपमध्ये वाढली अंतर्गत धुसफूस
नागपूर

आघाडी झाल्यास भाजपला महानगरपालिकेत धोका? निकालाने दिले संकेत

अनेक नगरपालिकांमध्ये जनतेने दोन्ही काँग्रेसने एकत्रच राहावे असाच कौल दिला

राजेश चरपे

नागपूर : विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडी (MahaVikasaghadi) एकत्र लढली तर राजकीय चित्र बदलू शकते असे स्पष्ट संकेत दिले आहे. अनेक नगरपालिकांमध्ये जनतेने दोन्ही काँग्रेसने एकत्रच राहावे असाच कौल दिला आहे. नागपूर महापालिकेला भाजपच्या तावडीतून सोडवायचे असेल तर स्वबळाची भाषा सोडून, नेत्यांना इगो बाजूला ठेवावा लागणार आहे.

विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचयात समित्या व नगरपालिका निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदार असताना भंडारा जिल्हा परिषद पूर्ण ताकद लाऊनही भाजपला जिंकता आली नाही. काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे वेगवेगळी लढली. नेत्यांमधील आपसातील भांडणामुळे येथे आघाडी होऊ शकली नाही.

मात्र, निकालामुळे दोन्ही काँग्रेसने एकत्रच राहावे असा कौल येथे स्थानिक जनतेने दिला आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील ५२ जागांपैकी काँग्रेसने २१, राष्ट्रवादीने १३ जागा जिंकल्या आहेत. भाजपला १२ जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना (shiv sena) एक, बसप एक यांना फक्त हजेरी लावता आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचे संबंध फक्त येथे भाजपला चमत्काराची आशा वाटत आहे. तशी चर्चाही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

शेजारच्याच गोंदिया जिल्ह्यात भाजपने मुसंडी मारली आहे. ५२ पैकी २५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस १४ व राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या आहेत. इतर पाच सदस्य निवडूण आले असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी यावेळी दोन्ही काँग्रेसची गरज भासणार नाही. मागील वेळी राष्ट्रवादीला (National Congress Party) बाहेर ठेवण्यासाठी भाजप-काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती हे विशेष. या दोन्ही जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये राष्ट्रवादीने आपली ताकद दाखविली आहे.

मेघे-पारवेंचे वर्चस्व

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि कुही येथील नगरपालिकेत स्थानिक आमदारांनी आपले वर्चस्व कायम राखले. आमदार समीर मेघे यांच्या मतदारसंघातील हिंगणा नगर पालिकेत १७ पैकी नऊ जागा भाजपने (BJP) जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले. शिवसेना एक, दोन अपक्ष सदस्य जिंकले असून काँग्रेस खात्यात भोपळा आला. उमरेड येथील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कुही नगरपालिकेत काँग्रेसने ८, राष्ट्रवादी ४ , भाजप ४ जागा जिंकल्या आहेत. एक अपक्ष सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात कुठलीच अडचण दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT