man lost his job as he tested corona positive  
नागपूर

हे काही भलतेच! कोरोनाची झाली लागण म्हणून कामगाराने गमावली नोकरी; अन रिपोर्ट आला निगेटिव्ह 

केवल जीवनतारे

नागपूर : एका खासगी कार्यालयात नोकरी करणाऱ्या एका तरुणाला खासगी प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित असल्याचा चाचणी अहवाल त्याच्या हातावर ठेवला. ही बाब या तरुणाच्या कार्यालयात पोहोचताच त्याला नोकरीवरून कमी करण्यात आले. दरम्यान महापालिकेच्या सेंटरवर केलेल्या चाचणीत हा तरुण कोरोना निगेटिव्ह आढळला. चुकीच्या अहवालामुळे त्याची नोकरी गमावली.

 यामुळे या तरुणावर उपासमारीची वेळ आली आहे. तरुणाचे कुटुंब घाबरले आहेत. महापालिकेच्या एक नव्हे तर दोन केंद्रातील चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, त्याच तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह कसा, असा प्रश्न निर्माण झाला. संबंधित शेख शाहिद शेख अब्दुल मजीद असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

मोमीनपुरा, गार्ड लाइन येथील रहिवासी शेख शाहिद शेख अब्दुल मजीद हा तरुण एका खासगी कार्यालयात काम करीत होता. कार्यालयातर्फे या तरुणास कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार तो १२ ऑगस्टरोजी महापालिकेच्या जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीला गेला. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. 

त्यानंतर कार्यालयातर्फे परत त्याला खासगी प्रयोगशाळेतून तपासणी करण्यास सांगितले. रामदासपेठेतील खासगी प्रयोगशाळेत पाठविले. दोनच दिवसानंतर १४ ऑगस्टला त्याने दुसरी चाचणी केली. अहवाल कोरोनाबाधित (पॉझिटिव्ह) आला. आपण तंदुरुस्त असून, कुठलीही लक्षणे नाहीत. तरीही, अहवाल वेगवेगळे का? असा सवाल या तरुणाने केला.

तिसरी चाचणी निगेटिव्ह

दोन चाचण्या केल्यानंतर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आली. यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाने आणखी घराजवळील महापालिकेच्या पाचपावली कोव्हिड सेंटरवर १५ ऑगस्टला तपासणी केली. तेव्हा परत अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे शाहीद अक्षरक्ष: हादरला. खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ला एका खासगी हॉटेलात विलगीकरणात ठेवले. या काळात त्याला कुणाचाही फोन आला नाही. शिवाय, कुठली औषधही घेतली नाही.

शाहीद ठणठणीत बरा झाला आहे. मात्र नोकरीवरून काढण्यात आल्यामुळे त्याच्यासह कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्यातील घोळ दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गेलेली नोकरी परत मिळावी यासाठी संबंधित कंपनीला निर्देश द्यावे, अशी मागणी या तरुणाने केली आहे. तर खासगी प्रयोगशाळेच्या विरोधात कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT