Man is no more due to Manja cut in Nagpur Breaking News  
नागपूर

हृदयद्रावक! उडलीच नाही त्या तरुणाच्या स्वप्नांची पतंग; दुचाकीवरून जाताना घडली अंगावर काटे आणणारी घटना

अनिल कांबळे

नागपूर ः समाजमन सुन्न करणारी आणि मुर्दाड प्रशासनाला पुन्हा जागं करणारी एक हृदयद्रावक घटना आज नागपुरात घडली आहे. या प्रकारामुळे एका निष्पाप आणि होतकरू तरुणाला जीवाला मुकावं लागलं आहे.  

नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्या गेल्याने २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी जाततरोडी परीसरात घडली. प्रणय प्रकाश ठाकरे (ज्ञानेश्‍वरनगर, मानेवाडा रोड) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या १० दिवसांतील मांजामुळे गेलेला तिसरा बळी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय ठाकरे हा मंगळवारी दुपारी वडीलासोबत वेगवेगळ्या दुचाकीने तहसीलमध्ये गेला होता. परत येत असताना प्रणय हा वडीलाच्या दुचाकीमागे आपली दुचाकी चालवित होता. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जाततरोडी चौकातून जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा गुंडाळला. त्याने दुचाकी थांबविली.

गळ्याभोवती गुंडाळलेल्या मांजा काढायला लागला. दरम्यान बाजुला जाणाऱ्या गाडीला तोच मांजा अडकला. त्यामुळे मांजा ताणल्या गेल्यामुळे गळ्याला घट्ट मांजा आवळल्या गेला. त्यामुळे प्रणयचा गळा कापला. लगेच रक्ताच्या चिरकांड्या गळ्यातून निघायला लागल्या. तो दुचाकीवरून खाली पडला. रस्त्यावरच रक्ताचा मोठा सडा पडला. त्याला नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच प्रणयचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद इमामवाडा पोलिसांनी केली.

मांजाचा तिसरा बळी

उपराजधानीत गेल्या १० दिवसांत मांजामुळे गेलेला तिसरा बळी आहे. दाभा परिसरात सात वर्षीय मुलगा वंश विकास तिरपुडे हा कटलेली पतंग पकडण्याच्या नादात कारखाली चिरडल्या गेल्या होता. तर ६ जानेवारीला एंटा विनोद सोळंकी हा १२ वर्षीय मुलगा धावत्या रेल्वेखाली सापडून मृत पावला होता. तर आता प्रणय ठाकरे याचा बळी गेला. आदित्य नावाच्या विद्यार्थ्यचा गळा कापल्या गेला होता. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT