Man sent photos of married girl to her husband in Nagpur  
नागपूर

सुखी संसारात सोशल मिडियाचे विघ्न; विवाहित प्रेयसीच्या पतीला पाठवले फोटो

अनिल कांबळे

नागपूर ः प्रत्येक घरात स्मार्ट फोन पोहचल्यामुळे सोशल मिडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. स्मार्टफोनचा अतिवापर होत असल्याचे गंभीर परिणाम कुटुंबसंस्थेवर पडत आहेत. सोशल मिडियाच्या वापरामुळे सुखी संसारात विघ्न निर्माण होत आहेत. अनेकांचे संसार तुटण्याच्या वाटेवर आहेत. तर पती-पत्नीतील संबंधसुद्धा बिघडत चालले आहेत. असाच एक प्रकार नागपुरात उघडकीस आला असून विवाहित महिलेच्या प्रियकराने पतीला अंतरंगाचे फोटो पाठवले. त्यामुळे पती-पत्नीत वाद होऊन संसाराला तडा गेला. या प्रकरणी महिलेच्या प्रियकरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मिडियाचा अतिवापरासह गैरवापर वाढला आहे. एका घरात राहणाऱ्या पती-पत्नी दोघांकडेही स्मार्ट फोन असल्यामुळे फेसबूक, वॉट्सॲप, ट्वीटर, इंस्टाग्राम, स्नॅक्स आणि युट्यूबवरील व्हीडिओ पाहण्यात दोघेही मग्न असतात. त्यांच्याकडे मुलांकडेही लक्ष देण्यास वेळ राहत नाही. मोबाईलच्या अतिवापरामुळे पती-पत्नी यांच्यामधील संबंधावर परिणाम पडत आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी कळमन्यात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेची फेसबूकवरून दुकानदार असलेल्या आरोपी रोहित हाडगे (२६, शांतीनगर प्लॉट, हनुमाननगर) याच्याशी ओळख झाली. दोघांची चॅटींग सुरू झाली. दोघांनी वॉट्सॲप नंबर घेतले आणि व्हिडिओ कॉलिंग करीत भेटायचे नियोजन केले. ती विवाहित होती तर रोहीत अविवाहित होता. दोघांनी एकमेकांची भेट घेतली. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. तिच्याकडून रोहितने उधारीच्या नावावर पैसेही उकळले. 

पतीच्या लपून दोघेही एकमेकांसोबत फिरायला गेले. त्याने महिलेसोबत काही ‘क्लोज’ फोटो काढले. त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण पतीला लागताच तिने अंतर राखण्यास सुरूवात केली. त्यामुळे दुखावलेल्या रोहीतने २१ नोव्हेंबरला घरी कुणी नसल्याचे बघत संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार देताच त्याने तिचे फोटो पतीच्या मोबाईलवर पाठवले. 

फोटो पाठवल्यामुळे घरात ‘तांडव’ सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून रोहीत हाडगेवर गुन्हा दाखल करून अटकही केली. मात्र, केवळ सोशल मिडियामुळे सुखी संसाराचा चुराडा झाला. आता पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आला असून शेवटच्या धाग्यावर नाते आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway : विकेंडला ३०० लोकल रद्द! पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाचा कधी आणि का?

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन

आलिया, अनन्या पेक्षाही जास्त मानधन घेते श्रद्धा कपूर; मुलीबद्दल शक्ती कपूर बोलले ते खरं आहे का? हे आहे सत्य

TET Result 2025 : टीईटी निकालाची तारीख ठरली? उत्तरसूचीवर हरकतीसाठी शेवटची संधी; साडेतीन लाख उमेदवारांची प्रतीक्षा संपणार

Morning Skincare Routine Tips: सकाळी सगळ्यात आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायचं की मॉइश्चरायझर? जाणून घ्या स्किनकेअर रूटीन टिप्स

SCROLL FOR NEXT