mini lockdown extended till one week in nagpur due to corona cases increases 
नागपूर

पुढील आठवड्यापर्यंत नागपुरात मिनी लॉकडाऊन, शनिवार अन् रविवारी बाजारपेठा बंद, तर मांस विक्री सुरू

राजेश प्रायकर

नागपूर : जिल्ह्यात चौदाशेच्या जवळपास कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ माजलेल्या प्रशासनाने मिनी लॉकडाउन आठवडाभर, अर्थात १४ मार्चपर्यंत वाढविले आहे. त्यामुळे पुन्हा एक आठवडा शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, आठवडी बाजार बंद राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक दुकाने वगळून शनिवार, रविवारी बाजारपेठा, दुकाने बंद राहणार आहेत. परंतु, या काळात मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. 

गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सहा हजारांवर रुग्ण आढळले. उपाययोजनेनंतरही बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाने नागरिक तसेच दुकानांवरील बंधने १४ मार्चपर्यंत वाढविले. त्यामुळे महाविद्यालय, शाळा, प्रशिक्षण संस्थांसह राजकीय, सांस्कृतिक, कार्यक्रमही बंद राहतील. आज शनिवार व रविवारी, दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत. परंतु, आज जिल्हा व मनपा प्रशासनाने काढलेल्या नव्या आदेशामुळे पुढील शनिवार, रविवारीही बाजारपेठा, दुकाने बंद राहणार आहेत. शनिवारी इतवारी, महाल, सिताबर्डीसह सर्वच मोठ्या बाजारपेठा बंद राहतील. दुकाने, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, हॉटेल, सरकारी, निमशासकीय कार्यालये बंद राहतील. त्यामुळे नागरिकांचा आणखी एक विकेंड घरांमध्येच जाणार आहे. नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदी व कामासाठी बाहेर पडता येणार आहे. 

कोरोना बाधितांची सातत्याने वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आज शनिवार रविवारी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाने पुढील १४ मार्चपर्यंत मिनी लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी संयम पाळून आरोग्याची काळजी घ्यावी. 
- डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री, 

अत्यावश्यक सेवा असेल सुरू 
दवाखाने, औषध दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, वृत्तपत्र, पेट्रोल पंप, किराणा दुकान, ऑनलाइन खाद्य पदार्थ, मटण, चिकनची दुकाने व इतर अत्यावश्यक सेवा. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT