Minor girl commits suicide by writing suicide note in rural Nagpur 
नागपूर

‘तो मुलींच्या आयुष्याशी खेळतो, बदनामी करतो’; गळफास लावलेल्या अल्पवयीन मुलीच्या हातात होती सुसाईट नोट

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ‘मी अमरवर प्रेम केले, पण त्याने मला धोका दिला. तो माझा गुन्हेगार आहे. तो मुलींच्या आयुष्याशी खेळतो. मुलींची बदनामी करतो’ अशी सुसाईड नोट लिहून अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काटोल तालुक्यातील ताराबोडी येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर गदाई (२०, रा. म्हसेपठार, मोहपा, ता. कळमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. अमर व अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलगी मेटपांजरा येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होती. ६ जानेवरी २०२१ रोजी मोहपा जवळच्या म्हसेपठार येथील एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सहकुटुंब ती आली होती.

येथे आरोपी अमर गदाई हा देखील आला होता. तेथून घरी परतल्यानंतर २५ जानेवारीला मुलीने ‘अमर हा त्याच्यासोबत पळून चलण्यास म्हणतो आहे. जर ती गेली नाही तर अश्लील फोटो व्हॉट्स ॲप करील’ अशी धमकी देत असल्याचे वडिलांना सांगितले होते. त्यावर वडिलांनी मुलीला समजावून शांत राहण्यास सांगितले होते.

दोन दिवसांनी मरगसूर येथील भवानी मंदिरात असलेल्या कार्यक्रमात अमरला मुलीच्या वडिलांनी समजावून सांगितले. त्यानंतर तेथून तो निघून गेला. दोन दिवसानंतर घरी कुणीही नसल्याचे हेरून मुलीने साडीच्या सहायाने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाताच घराकडे धाव घेऊन तिला फासावरून उतरविले.

यावेळी तिच्या हातात स्व:हस्ताक्षरातील सुसाईड नोट आढळून आली. या नोटमध्ये ‘मी अमरवर प्रेम केले, पण त्याने मला धोका दिला. तो माझा गुन्हेगार आहे. तो मुलींच्या आयुष्याशी खेळतो, मुलींची बदनामी करतो’ असे लिहलेले होते. यानंतर कुटुंबीयांनी घटनेची माहिती काटोल पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मुलीच्या वडिलांच्या तक्ररीवरून व सुसाईड नोटवरून आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT