monsoon in nagpur city 
नागपूर

दक्षिण नागपुरात धो-धो

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात सक्रीय असलेल्या मॉन्सूनने लागोपाठ दुसऱ्याही दिवशी उपराजधानीला दणका दिला. दुपारच्या सुमारास अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन- तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने "वीकेंड'पर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. 

रविवारी मुसळधार पावसाने तासभर झोडपून काढल्यानंतर अपेक्षेप्रमाणे आजही पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी दोननंतर शहरातील जवळपास सर्वच भागांत हलक्‍या ते जोरदार सरी बरसल्या. विशेषत: दक्षिण नागपुरात धो-धो पाऊस पडला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत रिपरिप सुरूच होती. दोन दिवसांपासून विदर्भात सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू आहे.

यंदा लवकर पाऊस आल्याने बळीराजा खुष असून, हळूहळू पेरण्यांनाही सुरूवात झाली आहे. सोमवारी विदर्भात चंद्रपूर येथे सर्वाधिक 63 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. वाशीम येथेही (60 मिलिमीटर) जोरदार बरसला. याशिवाय अमरावती व वर्धा जिल्ह्यांतही मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याचे वृत्त आहे. नागपुरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 13.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आले. 

शहरात एक जूनपासून आतापर्यंत 168 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिलेला असल्याने हा आठवडाही पावसाचाच राहणार आहे. 19 जूनच्या आसपास बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्‌टा तयार होणार असल्याने त्यानंतरही विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT