more than two thousand student took admission in 11th on first day in nagpur 
नागपूर

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी प्रकाशित, पहिल्याच दिवशी २ हजारांवर प्रवेश

मंगेश गोमासे

नागपूर :  अकरावीच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेच्या शनिवारी घोषित करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात आले. त्यानुसार पहिल्याच दिवशी २ हजार ९१ प्रवेश देण्यात आलेत. ९ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत. नागपुरात ५९ हजार १७० जागांपैकी १३ हजार ४५४ जागांवर प्रवेश देण्यात आले असून अद्याप ४५ हजार १७६ जागा रिक्त आहेत. दुसऱ्या फेरीसाठी २८ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी निश्चित केली.  

अकरावी प्रवेश प्रक्रियेत शहरातील २१६ कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात आली. यात अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता आले. ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीताल १२ हजार ३३० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले. मात्र, यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली. त्यामुळे राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेशास तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली. तब्बल दोन महिने प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होता. मात्र, पुन्हा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत एकूण ४० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३४ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविला. आज विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रकाशित करुन प्रवेशास सुरुवात करण्यात आली. त्यात पहिल्याच दिवशी २ हजार ९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. १० डिसेंबरला नियमित फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रकाशित करण्यात येईल.  

जागांची संख्या - 
कला - ९,६६० 
वाणिज्य - १७,९२० 
विज्ञान - २७,३३० 
एमसीव्हीसी - ४,१३० 

प्रवेशाचे वेळापत्रक -
५ ते ९ डिसेंबर - महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करणे. 
१० डिसेंबर - नियमित फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रकाशित करणे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

MPSC Protest: 5 वर्षांपासून पुण्यात राहून PSI होण्याचं स्वप्न... बाप शेतमजुरी करून पैसे पाठवतो, पण आयोग? विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

Savitribai Phule Jayanti: संघर्षातून घडलेली क्रांती! सावित्रीबाई फुलेंचे 10 विचार बदलतील तुमचं विचारविश्व

Gemini Horoscope : यशासाठी झगडल्याशिवाय पर्याय नाही, नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, पण..; मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल नवीन वर्ष?

Uddhav Thackeray : दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही

SCROLL FOR NEXT