Moreshwar Balbude provided employment through agriculture 
नागपूर

उत्तम शेती करून पेटविली ६० कुटुंबांची चूल; मोरेश्वर बाळबुदे यांनी दिला शेतीतून रोजगार

गुरुदेव वनदुधे

पचखेडी (जि. नागपूर) : ‘घेणाऱ्याने घेत रहावे, देणाऱ्याने देत राहावे
घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचेच हात घ्यावे!’

कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळींप्रमाणे शेतीच्या पडत्या काळातही ‘दात्या’ने शेतीतून साठ कुटुंबांच्या आजच्या काळाच चुली पेटविल्या. पुनर्वसन झालेल्या गोन्हा येथील मोरेश्वर बाळबुदे हे वेलतूर येथे स्थायिक झाले. त्यांनी पचखेडी शिवारात वीस एकर गोटाळी व मुरमाळ जागा घेतली. त्या जमिनीची योग्य मशागत करून शासकीय योजनेतून व काही स्वखर्चाने नियोजन करीत ठिबक सिंचन योजना राबविली.

तिथे मिरचीची लागवड घेणे सुरू केले. त्यासाठी त्यांना नियमित मजुरांची गरज भासते. त्यांना नियमित दहा नोकर व पन्नास महिला मजुरांची गरज पडते. त्यामुळे ते बावीस एकरात साठ कुटुंब चालवतात, असे येथील महिला मजूर प्रमीला मनोहर देशमुख यांनी सांगितले.

आजघडीला त्यांच्याकडे बावीस एकर शेतात मिरचीचे पीक असून, आजतागायत चाळीस लाखांची मिरची विकून झाली. तेवढ्याच रुपयांचे मिरची पीक होणार असल्याचे बाळबुदे यांनी सांगितले. आज शासनाच्या अधिन राहून कारखानदार मजुराला काम देत असल्याचा पुळका आणतो. पण शेती कसून नियोजनबध्द रितीने तिचे संगोपन केल्यास शेतकरी हा कारखानदारांपेक्षा कमी नसल्याचे दिसून येते.

मात्र, त्यासाठी शासनाने शेतमालाला खर्चाच्या दुप्पट भाव दिला पाहिजे. शेतीपिकावर आधारित व्यवसाय करणारे व्यापारी मालामाल होत चालले. शेतकरी कफल्लक होऊन शेती विकायला काढत आहेत. कारण, शेतमालाचा भाव दहा ते पंधरावर्षापूर्वी होता तोच आहे.

खतांचे व औषधीचे भाव दहा पटीने वाढलेले आहेत. तसेच मजुरांचे रोज तिपटीने वाढले. याचे शासनाला सोयरसुतक नाही. यावरही मात देत मोरेश्वर बाळबुधे हे साठ कुटुंबाला वर्षभर काम देत असल्याने त्यांच्या पिकाची पंचक्रोशीत चर्चा होत असून त्यांचे कौतुक होत आहे.

शेतीवर साठ कुटुंब अवलंबून
एवढे वैभव निर्माण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. आपण पैसै किती कमावतो, यापेक्षा आपण किती लोकांना रोजगार देतो, हे महत्त्वाचे आहे. आपल्या शेतीवर साठ कुटुंब अवलंबून आहेत. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवतो, यांचे समाधान आहे. शासनाने खर्चाच्या दुप्पट भाव मिळाला तर आमची शेती कारखान्याच्या कुठेही कमी पडणार नाही. 
- मोरेश्वर बाळबुधे,
प्रगतशील शेतकरी

आमच्या आयुष्याचे कर्तेधर्ते बाळबुधे साहेबच
आम्ही वर्षभरही शेतात राबतो. मिरची काढणी झाली की मिरचीची झाडे उपटणे, शेती साफ करणे, नंतर रोपांची जोपासना करणे, लागवड करणे, निंदन करणे यासाठी आम्हाला वर्षभरही काम मिळते. त्यामुळे आम्हाला कुठेही काम शोधायची गरज पडत नसल्याने आमच्या आयुष्याचे कर्तेधर्ते बाळबुधे साहेबच आहेत.
- शांताबाई चापले,
मजूर, वेलतूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT