नागपूर

दुर्देवी नोंद : पाच महिन्यांत सर्वाधिक मृत्यू प्रमाणपत्र वितरित

राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाने (coronavirus) शहराचेच चित्र पालटले. त्यात आता मृत्यू प्रमाणपत्र वितरणाच्या दुर्देवी संख्येचीही भर पडली. पाच महिन्यांत महापालिकेने सर्वाधिक मृत्यू प्रमाणपत्र वितरित (Most death certificates distributed) केल्याची बाब पुढे आली. मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यांत तुलनेत यावर्षी दुपटीपेक्षाही जास्त प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. (Most-death-certificates-delivered-in-five-months-this-year)

शहरात मार्च, एप्रिलमध्ये कोरोनाने अक्षरशः मृत्यूचे थैमान घातले. त्यामुळे अनेक कुटुंब, लहान मुलेही निराधार झाले. मार्च, एप्रिलमध्ये अंत्यसंस्कारालाही घाटावरील ओटे कमी पडले, एवढे विदारक चित्र होते. आता महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू प्रमाणपत्र वितरणानेही पाच महिन्यांतील भयाण वास्तव पुढे आले.

मागील वर्षी २०२० मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यांत ९ हजार ९६८ मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावर्षी याच पाच महिन्यांत २२ हजार १५६ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी १२२ अशी आहे. यात सर्वाधिक मृत्यू प्रमाणपत्र एप्रिल महिन्यात वितरित करण्यात आले. या महिन्यात ६ हजार ८९२ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एप्रिल महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले.

मागील वर्षी एकूण ३१ हजार ६५१ मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या आकडेवारीचा विचार केल्यास यंदा पहिल्या पाच महिन्यांत ७० टक्के प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यातूनच गेल्या पाच महिन्यांत नागपुरात कोरोनाने अनेकांचे घर उद्‍ध्वस्त केल्याचे दिसून येत आहे. अनेकांचा आधार हिरावला. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मोठी लाट होती. सप्टेंबर २०२० मध्ये ५००६ मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मागील वर्षी मेमध्ये लाट कमी असल्याने १ हजार ३९९ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते.

अनेक प्रमाणपत्र प्रलंबित

तांत्रिक बिघाडामुळे २० मेपासून काही दिवस जन्म-मृत्यूची नोंदणी बंद होती. त्यामुळे या काळात अनेकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नाही. एप्रिल किंवा मे महिन्यांत मृत्यू झालेल्यांचे अनेक प्रमाणपत्र अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्राची संख्या आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तीन वर्षांत वितरित प्रमाणपत्र

वर्ष मृत्यू प्रमाणपत्राची संख्या एप्रिलमध्ये वितरित प्रमाणपत्र

२०१९ २९,४२६ २,१५६

२०२० ३१,६५१ १,५२७

२०२१ (मेपर्यंत) २२,१५६ ६,८९२

(Most-death-certificates-delivered-in-five-months-this-year)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांचे कोट्यवधी रुपये ‘सांडपाण्या’त; दर्जाहीन कामे, गळक्या वाहिन्यांमुळे मुळा-मुठा नदी बनली गटार

Thane Fire: ठाण्यात मध्यरात्री आगीचा थरार! एकामागोमाग २३ वाहनांनी घेतला पेट, परिसरात धुराचे मोठे लोट; Video Viral

Samruddhi Expressway: ट्रकला आग लागून चालकाचा जळून मृत्यू; पुलाखाली पडल्याने दुसऱ्याचा अंत

Latest Marathi News Live Update : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला, हा काळा दिवस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gokul Milk Union Election : सतेज पाटलांविरोधात, हसन मुश्रीफांनी कंबर कसली; ठरावधारक ऐन सणासुदीत सहलीवर; क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून जोरदार फिल्डींग

SCROLL FOR NEXT