MP Patel said NCP should meet at various places in the city Nagpur political news
MP Patel said NCP should meet at various places in the city Nagpur political news 
नागपूर

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणणार रंगत; खासदार पटेल यांनी दिला कानमंत्र

राजेश प्रायकर

नागपूर : पुढील महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील विविध भागांत मेळावे घेणार आहे. पक्षाच्या बळकटीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याबाबत कानमंत्र दिला. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस रंगत आणणार असल्याची चिन्हे आहेत. 

काछीपुरा येथील जय जवान, जय किसान संघटनेच्या कार्यालयात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री रमेश बंग, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल अहीरकर, मनपातील राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, राजेंद्र जैन, बाबा गुजर, सतीश इटकेलवार, शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा लक्ष्मी सावरकर, माजी नगरसेवक राजेश माटे, महेंद्र भांगे, राजेंद्र तिवारी, सुनील कुंडे, संतोष सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार पटेल यांनी शहरातील पक्षातील मरगळ दूर करण्याची गरज व्यक्त केली. पुढील महापालिका निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांना ‘बूस्ट’ देऊन शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे, तर विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच इतर पक्षांतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांसाठी शहराच्या विविध भागांत मेळावे घेण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. 

मेट्रोरिजनमधील अनधिकृत ले-आउटला मंजुरी, विकास शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मेट्रोरिजनमधील समस्यांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर शहरातील अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. प्रशांत पवार यांनी प्रास्ताविकातून मेट्रोरिजनमधील समस्या मांडल्या. यावेळी चारशेवर कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT