Municipal Corporation disobeyed the orders of the Chief Minister 
नागपूर

महापालिकेने मुख्यमंत्र्यांचेही आदेश पायदळी तुडविले; सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत कर्मचारी

राजेश प्रायकर

नागपूर : सभागृहात महापौरांनी दिलेले आदेश धुडकावून लावण्याची सवय असलेल्या महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशही पायदळी तुडविल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. परंतु, महिना होऊनही कर्मचारी, अधिकारी सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहे. महापालिकेचा वित्त विभाग झारीतील शुक्राचार्य ठरल्याची चर्चा असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या प्रयत्नांनाही खीळ बसली आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी नुकताच १ जानेवारीला महापालिकेतील राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांची भेट घेतल्याचे सूत्राने नमूद केले. आयुक्त राधाकृष्णन यांनी वित्त विभागाला सातव्या वेतन आयोगासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. परंतु, वित्त विभागाने अद्यापही यासंबंधी कार्यवाही करण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगात अडथळा निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला सातव्या वेतन आयोगासंबंधी अटी पुढे करीत आतापर्यंत किती वसुली झाली, असे पत्र दिले. यातून वित्त व लेखा विभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रयत्न केले होते. वित्त व लेखा विभागामुळे त्यांच्या प्रयत्नांनाही खीळ बसल्याचे चित्र आहे. 

११ हजार कर्मचारी निराश

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे महापालिकेतील अकरा हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना लाभ होणार आहे. परंतु, महिनाभरानंतरही सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने हे कर्मचारी निराश झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्याही आदेशाला प्रशासन जुमानत नसेल तर कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT