Nagpur also had a Vaccine Research Institute Goddess and cholera vaccine was produced 
नागपूर

नागपुरात देवी, कॉलराने थैमान घातला असताना लावला होता लसीचा शोध; आता होतेय आठवण

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनामुळे ज्या प्रमाणात मणुष्यहानी होत आहे तशीच जीवितहानी पन्नास ते साठ वर्षांपूर्वी देवीच्या आजाराने झाली होती. ‘देवीचा रुग्ण दाखवा आणि १००० रुपये मिळवा’ अशा जाहिराती भिंतीवर दिसत होत्या. देवीच्या आजारावर परिणामकारक ठरलेली लस शहरातच तयार झाली होती. विशेष म्हणजे कॉलराविरुध्दची लसही येथेच तयार झाली होती. त्यामुळे हे संशोधन केंद्र जर अस्तित्वात असते तर कदाचित कोरोनाविरुध्द लढ्याला आणखी बळ मिळाले असते.

कोरोनाचा हा प्रकोप बघता माता कचेरी येथील ‘व्हॅक्सिन इन्स्टिट्युट’ची आठवण जुन्याजाणत्या वैद्यकतज्ज्ञांना झाली. याच प्रयोगशाळेत तयार झालेल्या लसीच्या मदतीने देवीचा आजार देशातून हद्दपार केला. कॉलराची लस नागपुरात तयार झाली होती. त्यामुळे आता १०० वर्षांपूर्वीच्या ‘व्हॅक्सिन इन्स्टिट्युट’चे स्मरण होत आहे. नागपुरातील ‘व्हॅक्सिन इन्स्टिट्युट’मध्ये १९०१ साली कॉलराच्या लसीवर संशोधन आणि चाचण्या सुरू झाल्या होत्या. 

देवीचा कोप म्हणून हा आजार होय असा समाजात भ्रम होता. या देवीच्या रोगाने (स्मॉलपॉक्स) सगळ्यांना हादरून सोडले होते. साथीच्या या रोगाची सुरुवात रुग्णाच्या चेहऱ्यावर पुरळ उठण्याने व्हायची. मग ते पुरळ आकाराने मोठे आणि लालभडक व्हायचे. देवीचा रोग झालेल्यांपैकी ३० ते ३५ टक्के रुग्णांचा मृत्यू व्हायचा.

वाचलेल्या ६५-७० टक्के लोकांच्या चेहऱ्यावर कायमचे व्रण उमटायचे. चेहरे विद्रूप होत असत. देवीच्या लसीसाठी नागपूरसह काही ठिकाणी चाचण्यांचे पर्व सुरू झाले. अनेक वर्षे शहरात देवीची लस बनत होती. पुढे कॉलराची लस येथे तयार झाली. एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली होती. सगळ्याच देशांत त्याच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या, असे तज्ज्ञ सांगतात.

हाफकीनच्या धर्तीवर असते व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट

नागपुरात माताकचेरी परिसरात हे संशोधन केंद्र होते. त्याच्या ऐतिहासिक खुणा आजही येथे दिसतात. आरोग्य विभागाचे केंद्र येथे आहे. प्राण्यांवरही संशोधन केले जात होते. याठिकाणी गायीचा गोठा आणि घोड्यांचा तबेला आजही दिसतो. गायीपासून बनलेली ही लस घोड्यांवर लादून इतरत्र पोहोचविली जात असे, असे येथील जुने कर्मचारी सांगतात. 

कॉलऱ्यावरील लस

माता कचेरीतील १९०१ मध्ये स्थापन केलेल्या व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटमध्ये १९६१ पर्यंत देवीच्या लसीची निर्मिती होत होती. यानंतर कॉलराची साथ आली तेव्हा १९६२ ते ६६ या काळात कॉलरा लसीच्या चाचण्यांना येथे झाल्या होत्या. १९७८पर्यंत येथे लस निर्माण होत होती, आज नागपुरातील व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट असते तर कोरोना लशीच्या चाचण्या सुरू झाल्या असत्या, असे आरोग्य कर्मचारी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT