नवजात बाळ
नवजात बाळ sakal
नागपूर

वेलतूर : उपचाराअभावी नवजात शिशूचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वेलतूर : प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर येथे प्रसूतीस आलेल्या महिलेला उपचाराअभावी नवजात शिशू गमवावे लागल्याची बाब उघडकीस आली. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात असंतोष खदखदत असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर येथे गर्भवती महिला अंजना रवींद्र चाचेरकर हिला प्रसूतीवेदना होत असल्याने शनिवारी रात्री दहा वाजता केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने कर्तव्यावरील परिचारकांनी त्यांना निवासस्थानी जाऊन बोलावले असता ते तब्बर तासभर उशीरा आले. त्यानंतरही त्यांनी महिलेची कोणतीच तपासणी केली नाही. पहाटे साडेचारच्या दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली. महिलेस नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तशी ‘रेफर स्लीप’ही बनविण्यात आली. दरम्यान रुग्णास नागपूर येथे नेत असताना वाटेत प्रसुतीवेदना तीव्र झाल्याने त्यांना वाटेतील कुही येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्यांनीही ‘रेफर टू नागपूर’ करून रुग्णाला नागपूरसाठी रवाना केले. त्यात महिलेची प्रसूती होऊन बाळ दगावले. रुग्णाने कित्येक किलोमीटरचा प्रवास बाळ अर्धवट बाहेर आलेल्या स्थितीत केला. त्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून डॉक्टरांच्या कार्यपध्द्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला वेळेत आणले असते तर बाळाचा जीव वाचवता आला असता असे म्हटले असल्याचे तक्रारीत नमुद केले. या प्रकारास वेलतूर येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य परिचारिका जबाबदार असून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारीतून देण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रकरण अतिशय गंभीर असून वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून प्रकरणी सर्वकष चौकशी करून दोषींवर तात्काळ प्रशासकीय कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा.

-अश्विनी तुकाराम शिवणकर, सभापती, पंचायत समिती, कुही

डॉक्टरांचा हा हलगर्जीपणा प्रसुत महिलेच्या जिवावरही बेतू शकत होता. तो नवजात शिशूवर बेतला, म्हणून वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा-

-रामकृष्ण पराते, प्रसुत महिलेचा नातेवाईक व तक्रारदार

चौकशी सुरू आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल. दोषींची गय केली जाणार नाही.

-डॉ.संजय निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी, कुही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT