Nagpur Corona Hotspot Seal the border not lockdown 
नागपूर

नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट : लॉकडाउन नाही तर सीमा करा सील; करा या उपाययोजना

केवल जीवनतारे

नागपूर : नागपूर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. महामारी नियंत्रणासाठी लॉकडाउन लावला पण रुग्ण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील कोविड केअर सेंटरसह सर्व उपाययोजनांना तिलांजली देण्यात आली. कोरोना पसरण्याची जी काही कारणे आहेत त्यामध्ये शहरात परजिल्ह्यातील नागरिकांचे लोंढे येणे हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. परिणामी कोरोनावर नियंत्रणासाठी लॉकडाउनची नव्हे तर नागपूर जिल्ह्याच्या सीमा सील करणे आवश्यक आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाची लाट नाही. यामुळे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक गैर कोरोना रुग्णांसह नातेवाईक नागपुरात येऊन कोरोनाबाधित होत आहेत. त्यांचे वाढते लोंढे कोरोना वाढीसाठी तसेच वाढत्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातून नागरिकांचे येणे जाणे किमान पंधरा दिवसांसाठी थांबवले तर कोरोनावर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.

एप्रिल २०२० मध्ये विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार यांनी कोरोनावरील नियंत्रणासाठी औषधी दुकानदारांकडून विक्री होत असलेल्या पॅरासिटेमाल, कफ सिरप या औषधांच्या विक्री संदर्भातील माहिती तसेच डॉक्‍टरांकडे येणाऱ्या सर्दी व ताप असलेल्या रुग्णांच्या माहितीसाठी ‘नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲप’ तयार केला होता. या माध्यमातून जनतेमधून कोरोनाची माहिती प्रशासनाकडे पोहोचणार होती. परंतु, हा ॲप कुठे हरवला हे कळायलाच मार्ग नाही. 

नियंत्रणासाठी उपाययोजना

  • मेयो, मेडिकलमध्ये केवळ गंभीर रुग्णांनाच दाखल करा
  • महापालिकेने प्रत्येक घरी सर्वेक्षण करावे
  • जिल्ह्यात ३७ हजार कोरोनाबाधित आहेत, त्यांच्या घरी फेविपिरावीर इतर औषधं पोहोचणे आवश्यक आहे
  • लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा
  • मेडिकल, मेयो पूर्णपणे कोविड हॉस्पिटल तयार केले तर इतर आजाराच्या रुग्णांसाठी डॉ. आंबेडकर रुग्णालय तसेच कामगार रुग्णालय सज्ज करा
  • खासगी रुग्णालयातून मेयो, मेडिकलमध्ये रेफरचे धोरण थांवविण्यात यावे. 

औषधं देऊन कोरोना ठीक होणार नाही
जिल्ह्यात २८ हजार कोरोनाबाधित गृहविलगीकरणात आहेत. एका घरात एक कोरोनाबाधित आढळताच त्याला तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलवल्यास कुटुंब कोरोनाच्या बाधेपासून दूर ठेवता येते. गृहविलगीकरणातील बाधितांना केवळ व्हिटॅमिनची औषधं देऊन कोरोना ठिक होणार नाही, त्यांच्यापर्यंत हायड्रोक्सिल क्लोरोक्वीन, फेविपिरावीर औषधाचा डोस देणे आवश्यक आहे. 
- डॉ. प्रशांत पाटील,
विभागप्रमुख, मेडिसीन, मेडिकल, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

"ते जुने गाऊन मी सिनेमात वापरले" भार्गवीने सांगितला वन रूम किचन सिनेमाचा खास किस्सा

SCROLL FOR NEXT