Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: पैसे मागितल्यावर वारंवार करायचा टाळाटाळ, उधारीच्या वादातून बापलेकाचा शेजाऱ्यावर हल्ला; तिघे जखमी

उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून बापलेकाने शेजाऱ्यावर हल्ला करीत तिघांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Conflict Due to Money Lending: उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून बापलेकाने शेजाऱ्यावर हल्ला करीत तिघांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. प्रणय ज्ञानेश्‍वर राजूरकर (वय २०, रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सुनील लक्ष्मण कांबळे (वय ४५, रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं.७) आणि तुषार सुनील कांबळे (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणयचे काका नरेन्द्र राजुरकर (वय ३३) यांनी सुनील यांना उधारीवर पैसे दिले होते. मात्र, ते पैसे परत मागीतले असता, सुनील यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत होती.

शुक्रवारी त्यांच्यात यावरून वाद झाला. त्यामुळे दोघेही एकमेकांशी भांडण करू लागले. ते सोडविण्यासाठी प्रणय गेला असता, त्याला दोघांनीही लाकडी राफ्टरने मारहाण करीत जखमी केले. याशिवाय काका सुनील आणि त्यांच्या पत्नीलाही मारहाण करीत जखमी केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT