nagpur  sakal
नागपूर

Nagpur Crime : ‘तू कोण आहे’ म्हणत भांडण सोडविणाऱ्याचा खून

शिवीगाळ केल्याने संतापाच्या भरात केले कृत्य

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - दोघांचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या ऑटोचालकाने त्याला शिविगाळ केल्याने संतापून चाकूने वार करीत खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी (ता. ८) दुपारी सव्वा बारा ते पाऊन वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महेंद्र रामाजी कोहळे (वय ३८, रा. श्री साईनगर, पेंढारकर कॉलेजसमोर, बहादुरा) असे मृताचे नाव आहे. त्याचा वॉटर प्युरिफायर खरेदी-विक्रीचा आणि दुरुस्तीचा व्यवसाय आहे. आशिक शेख वल्द बब्बु शेख रहेमान (वय २२, रा. राऊतनगर, वाठोडा) असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र रविवार असल्याने घरी मटण करण्याच्या उद्देशाने दिघोरी टोल नाक्यासमोरील मटणाच्या दुकानात गेला. यावेळी तिथे त्याचे एकाशी कडाक्याचे भांडण झाले. तिथे ऑटोचालक आशिक शेख हा ऑटोसह उभा होता. त्याला दोघांचाही भांडणाचा आवाज आला.

तो तिथे भांडण बघण्यासाठी गेला. दरम्यान, त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेला असता, महेंद्र याने त्यांच्याशी भांडण सोडून आशिकला शिवीगाळ करीत, ‘तू कोण आहे मध्ये येणारा’ असे म्हटले. त्याला आईची शिवी दिल्याने तो अधिकच संतापला.

त्याने धावत जात ऑटोतून चाकू काढून थेट महेंद्रच्या डोक्यावर, छातीवर व मानेवर वार करून गंभीर जखमी केले व पसार झाला. दरम्यान, महेंद्रला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांना माहिती मिळताच विक्रांत सगणे यांच्या नेतृत्वात ताफ्याने परिसर गाठून तपास सुरू केला. याप्रकरणी पत्नी मेघा कोहळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे यांनी गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेतले व तपास सुरू केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT