नागपूर

Nagpur Crime: शेजारी राहणाऱ्या 'चाचा'ची पडली वाईट नजर, अत्याचार करण्यासाठी जंगलात नेल्यावर चिमुकलीने केले पलायन

शेजारी राहणाऱ्या तरुणाने ९ वर्षीय मुलीला फूस लावून जंगलात नेले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना ती मुलगी आपला जीव मुठीत घेऊन पळून गेल्याने बचावली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Hingna Physcial Assault on Minor Girl: शेजारी राहणाऱ्या तरुणाने ९ वर्षीय मुलीला फूस लावून जंगलात नेले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना ती मुलगी आपला जीव मुठीत घेऊन पळून गेल्याने बचावली. ही घटना शुक्रवारी (२६)सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सोनू ऊर्फ मोहम्मद सरफराज जहागीर आलम ( २२)असे आरोपीचे नाव असून तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात येणाऱ्या झोपडपट्टीत राहतो. त्याच्या शेजारी राहणारी ९ वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी चार वाजता या परिसरात असलेल्या लंगरमध्ये आपल्या भावासोबत गेली होती. तिथे हजर असलेला आरोपी सोनुने तिला काही सामान खरेदी करून आणायसाठी सायकल वर बसवून घेऊन गेला.

ती मुलगी देखील त्याला चाचा म्हणून हाक मारत होती. त्यामुळे ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. तासभर आरोपीने तिला सायकलवर परिसरात फिरवलं. त्यानंतर डिगडोह परिसरात डँपिंग यार्डच्या काही अंतरावर असलेल्या जंगलात घेऊन गेला. तिथे बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शौचास जाऊ देण्याची विनंती केली. थोडे दूर गेल्यानंतर तिने पळ काढला आणि मुख्य रस्त्यावर आली. (Latest Marathi News)

मदतीसाठी ओरडत असताना तिला एका शाळेचे दोन सुरक्षारक्षक दिसले. त्यांच्याकडे तिने सर्व प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षकांनी तिला काही कपडे घालायला दिले व एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली.

ठाणेदार भीमा नरके यांनी तत्काळ तिथे पोहचले. जंगलातून पळत येताना ती काही ठिकाणी पडली असल्याने काटेरी झुडपामुळे ती किरकोळ जखमी झाली होती.त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक उपचार करून तिला घेऊन मुलीच्या घरी पोहचले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार भीमा नरके यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार केले होते. त्यांनी घटनेच्या काही तासातच आरोपीला तो राहत असलेल्या परिसरातून ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT