nagpur death
nagpur death Sakal
नागपूर

Nagpur : ६५ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

उमरेड - कर्जबाजारीपणामुळे बेसूर या गावातील ६५ वर्षीय शेतकरी रामकृष्ण तुळशीराम गिरडे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

शेतीचा धंदा तोट्याचा होत असल्याने आणि निसर्गही साथ देत नसल्याने नैराश्य आलेले शेतकरी आत्महत्त्येचा मार्ग पत्करत आहेत. शेतीसाठी कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. रामकृष्ण यांनी बेसूर येथील आयडीबीआय बॅंकेतून शेतीवर २ लाख १५ हजारांचे कर्ज घेतले. मात्र, त्यानंतर सततची नापिकी मागे लागल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला.

त्यातच शरीर साथ देत नसल्याने त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली होती. बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना वाटत होती. पीकपाणी बरे झाले असते तर कर्जाचे हप्ते भरता आले असते. पण दिवसेंदिवस व्याज वाढत चालल्याने त्यांच्या जिवाला घोर लागला होता. सोबतच कर्ज फेडण्यासाठी बॅंकेचा तगादा सुरू असल्याने दडपणाखाली येऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

रामकृष्ण तुळशीराम गिरडे यांनी आत्महत्या केली, अशी फिर्यादी नीलेश हिरालाल गिरडे(वय३८) रा-बेसूर यांनी दिली. तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात दिनेश गाडगे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT