nagpur sakal
नागपूर

Nagpur Flood : पुरासाठी कारणीभूत ठरलेला पूल तोडणार

नाग नदीच्या प्रवाहातील अडथळा होणार दूर; लवकरच प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलावाचे पाणी नदीतून वस्त्यांमध्ये शिरले. परंतु यात एका लहान पुलामुळे कार्पोरेशन कॉलनी व लागून असलेल्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

भविष्यातही या पुलामुळे वस्तीमध्ये पाणी शिरण्याचा धोका बघता नाग नदीतील हा पूल आता पाडण्यात येणार आहे. २२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या पावसाने शहरातील अनेक वस्त्यांना फटका बसला. यात प्रामुख्याने अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, वर्मा लेआऊट, डागा लेआऊट व कार्पोरेशन कॉलनी या परिसरात एक ते दीड माणूस पाणी साचले. परिणामी नागरिकांच्या घरातील साहित्याची नासधूस झाली.

कार्पोरेशन कॉलनीमधील आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकच्या बाजूलाच नाग नदीमध्ये लहान पूल आहे. या पुलाच्यावर पाणी होते. पूल लहान असल्याने नाग नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे स्केटिंग रिंक तसेच बाजूच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यांच्या घरातील सर्वच विद्युत साहित्य, सोफा, गाद्या, घरातील धान्याची नासधूस झाली.

एवढेच नव्हे चारचाकी वाहनांमध्येही पाणी शिरले. कार्पोरेशऩ कॉलनीतील कार दोनशे मिटरपर्यंत वाहून गेल्या. एका एका घरचे जवळपास पाच ते सहा लाख रुपये नुकसान झाले. त्यामुळे येथील नागरिकांनी हा पूल तोडून नाग नदीतील पाण्याच्या प्रवाह सुरळीत करण्याची मागणी लावून धरली होती. आता हा पूल तोडण्यात येणार आहे.

नासुप्र विश्वस्तांच्या बैठकीत येणार प्रस्ताव

नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तांची सभा येत्या ८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्केटिंग रिंकजवळील पूल तोडण्याचा प्रस्ताव येणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. विश्वस्तांच्या मंजुरीनंतर पूल तोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind Vs SA 2nd Test : भारतीय खेळाडूंची दाणादाण, गौतमच्या निर्णयांमुळे अवस्था 'गंभीर', चाहत्यांना आठवला ग्रेग चॅपलचा काळ

Viral Video Teacher Student : दोन मुलींना शिकवण्यासाठी १२ वर्षे जीवन सर जंगल तुडवतात, पोरींनी दिलेलं उत्तर पाहून डोळ्यात पाणी येणारचं; हार्ट टचींग व्हिडिओ...

Latest Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Beed Crime : संतापजनक! बीडमध्ये साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या पोटात असह्य वेदना होत असताना...

Nano Banana Pro : गुगलने नुकतच लाँच केलेलं Nano Banana Pro कसं वापरायचं? इंटरनेट धुमाकूळ घालणारा हा एडिटर एकदा बघाच

SCROLL FOR NEXT