flood  sakal
नागपूर

Nagpur Flood News : असा कसा वाहून गेला रस्ता ?

बांधकामाच्या दर्जाबाबत शंका दोन वर्षातच पितळ उघडे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शहरातील सिमेंट रस्ते पन्नास वर्षे टिकतील, असा दावा केला जातो. परंतु दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या अंबाझरी तलावापुढील रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकही आता बांधकामाबाबत शंका व्यक्त करीत आहेत. पावसाच्या एका दणक्यात या रस्त्याच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन वर्षापूर्वी अंबाझरी ओव्हर फ्लोसमोरील सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. सिमेंट रस्त्याच्या बाजूने फूटपाथ तयार करण्यात आले. रस्त्याच्या काही भागामध्ये आयब्लॉक लावण्यात आले होते. शनिवारी पहाटे झालेल्या तीन तासांच्या पावसाने अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला.

या ओव्हर फ्लोच्या पाण्याच्या प्रवाहात हा रस्ताच वाहून गेला. रस्त्यावरील सर्व आयब्लॉक डागा ले-आऊटमधील गल्ल्यांमध्ये दिसून आले. एवढेच नव्हे या रस्त्यावर चार फूटापर्यंत खोल खड्डे पडले आहेत.

काही भागात रस्त्याखालील माती वाहून गेली आहे. आज सकाळी अनेकांना येथे रस्ता होता की नाही, असा प्रश्न पडला. दोन वर्षापूर्वीच तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची दुर्दशा बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पाण्याचा वेगवान प्रवाहामुळे रस्त्यांच्या अनेक भागात उंचवटा तयार झाला.

एकूणच या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाचेच पितळ उघडे पडल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या या रस्त्यांच्या बांधकामाने मोठमोठी दावे करणाऱ्या नेत्यांनाही तोंडघशी पाडल्याचे दिसून येत आहे. ज्या कंत्राटदाराने हा रस्ता बांधला, त्याच्यावर आता कुठली कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT