Nagpur News  Esakal
नागपूर

Nagpur : बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थिनी वसतिगृहात संपवलं जीवन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली घटना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) बी.एससी. नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. ऋतुजा बागडे (वय १९) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Government College Student Ended her Life: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) बी.एससी. नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. ऋतुजा बागडे (वय १९) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ऋतुजाच्या मृत्यूने वसतिगृहावर शोककळा पसरली आहे.

ऋतुजा बागडे बीएससीच्या प्रथम वर्षाला शिकत होती. सप्टेंबरमध्येजच कॉलेज सुरू झाले होते. नर्सिंग महाविद्यालयात तिची नियमित हजेरी होती. मेडिकल परिसरात नर्सिंग वसतिगृहातील खोलीत एकटीच राहात होती. तिची पहिल्या सत्राची परीक्षा होती.

ती एकटीच अभ्यास करण्यासाठी वेगळ्या खोलीत जात असे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ती तिच्या खोलीत गेली. रात्री १२ वाजता तिने मोबाईलचे स्टेटस बघितले होते. परंतु सकाळी ७ च्या सुमारास नियमित गणनेच्यावेळी ती हजर झाली नाही. त्यामुळे अन्य विद्यार्थिनी तिला बोलवायला तिच्या खोलीकडे गेल्या. दार आतून लावलेले दिसले. आवाज देऊनही प्रतिसाद नसल्याने काही विद्यार्थिनींनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता तिला गळफास लागलेल्या स्थितीत पाहून त्यांना धक्का बसला.(Latest Marathi News)

मेडिकल प्रशासनातर्फे लगेच अजनी पोलिसांना माहिती देण्यात आली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी तिचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यात आले. रात्री नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. या घटनेने नर्सिंग महाविद्यालयात हळहळ व्यक्त होत आहे.

वर्षभरात चौघांचा मृत्यू

बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये जुलै २०२३ मध्ये जम्मू काश्मीरच्या शीतल राजकुमार या विद्यार्थीनीचा दुषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये सेलू येथे एमएससीच्या अंतिम वर्षाला शिकणारी शैला मुंगळ हिने सेलू येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. (Latest Marathi News)

१७ सप्टेंबरला शैलाला भेटण्यासाठी एमएससी नर्सिंगचा विद्यार्थी सचिन कांबळे गेला होता. परत येत असताना सचिनचाही अपघात झाला होता. अशा बी.एससी., एम.एससी.ला शिकणाऱ्या चार जणांचा वर्षभरात मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT