Nagpur  Esakal
नागपूर

Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट, तापमान ४० अंशांच्या पुढे; पुढील दोन दिवस उष्ण

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Heat Wave in Vidarbha Region: यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. दोन दिवस हीट वेवचा अंदाज असून, पहिल्याच दिवशी तापमानाने चाळीशी गाठली आहे.

उन्हाची तीव्रता यंदा अधिक जाणवत आहे. यंदा उशिराने उन्हाची तीव्रता जाणवण्यास सुरवात झाली असली तरी अधिक तापदायक जाणवत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४०वर गेले आहे. एप्रिल महिन्याची जेमतेम सुरवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यात तापमानाने चाळिशी ओलांडल्याने नागरिक ऊन्हाने त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे.

एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. शनिवारी (ता.सहा) तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात आता वातावरणातील बदलामुळे यवतमाळचे तापमान ४२.२ अंशावर गेले आहे. वाढत्या तापमानात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.(Latest Marathi News)

प्रचारात उमेदवार अन् कार्यकर्त्यांची दमछाक

विदर्भात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर चढला आहे. वाढत्या उन्हामुळे प्रचार करणाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. एरवी आपल्या आलिशान वातानुकूलित वाहनांतून फिरणाऱ्या नेत्यांना तापमानात घाम गाळावा लागत आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय तापमान

अकोला-४२.०

अमरावती-४१.४

बुलडाणा-३७.६

ब्रम्हपुरी-४२.०

चंद्रपूर-४२.६

गडचिरोली-४१.०

गोंदिया-४०.५

नागपूर-४१.३

वर्धा-४२.०

वाशीम-४१.४

यवतमाळ-४२.२ (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT