वाघाचा मृत्यू sakal
नागपूर

Nagpur : दोन वाघांच्या झुंजीत वाघाचा एकाचा मृत्यू

कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

उमरेड : उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात शनिवारी वन कर्मचाऱ्याला वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील वनरक्षक जफरअली सदय्य हे १४१८ या संरक्षित क्षेत्रात गस्तीवर असताना त्यांना उग्र वास आला. त्यामुळे त्यांनी नाल्याच्या किनारी दाट झुडपात तपासणी केली. तेव्हा त्यांना वाघाचा मृतदेह कुजलेला आढळला. घटनेचा माहिती क्षेत्र संचालक श्रीमती ए. श्रीलक्ष्मी, पेंच व्याघ्र प्रकल्प अधिकारी प्रमोद पंचभाई यांना दिली. ते घटनास्थळी दाखल झाले.

शवविच्छेदन करण्यात आले. वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. नियमानुसार वाघाचे दहन करण्यात आले. प्राथमिक तपासणीत वाघाच्या अंगावर सुळे घुसल्याच्या खुणा होत्या. तर खुब्याचे हाड तुटलेल्या अवस्थेत होते. दोन वाघांच्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला. दहन करताना सहायय्क वन संरक्षक मंगेश ठेंगडी, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे, प्रफुल्ल भांबुरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी टेंभुर्णे उपस्थित होते. तपास मंगेश टेंगडी आणि वन परीक्षेत्र अधिकारी मंगेश एम. ताटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT