नागपूर

मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपूरची आघाडी; आरोग्य यंत्रणेत सुधारणा

राजेश चरपे

नागपूर : आरोग्य यंत्रणा बळकटीकरणात (Strengthening the health system) नागपूरने मुंबई, पुणे शहरालाही मागे टाकले आहे. दहा लाख लोकसंख्येमागे असणारी सर्वप्रकारच्या बेड्‌सची संख्या इतर शहरांपेक्षा सर्वाधिक आहे. यामध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. (Nagpur leads compared to Mumbai and Pune)

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाखांच्या घरात आहे. नागपूर शहराची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात असून, नागपूर जिल्हाच नव्हे तर नजिकच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरील शहरांतील नागरिकही नागपूर शहरातील आरोग्य सेवांचा लाभ घेत आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा बहुतांश नागपूर शहरात उपलब्ध आहेत.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर मार्च महिन्याच्या उत्तरार्धात दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येत वाढ झाली. आरोग्य यंत्रणेवरचा ताण या काळात प्रचंड वाढला. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची व्यवस्था करण्यासोबतच बेड्‌सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंड फडणवीस यांच्या पुढाकारातून व्हेंटिलेटरसह अन्य आरोग्य उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. परिणामी सध्या नागपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत प्रति दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या बेड्‌सची संख्या राज्यात सर्वाधिक आहे.

सर्वाधिक बेड्‌स

नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड्‌स १६,६३२ आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या बेड्‌सची संख्या ९,९४४ तर आय.सी.यू. बेड्‌सची संख्या २,८०८ आहे. आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्‌सची संख्या ९९६ आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ३,६१६ बेड्‌स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ऑक्सिजन बेड्‌स २,१६२, आय.सी.यू. बेड्‌स ६१०, तर आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्‌स २१७ आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.

(Nagpur leads compared to Mumbai and Pune)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT