Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : दुर्मीळ मराठी नाटकांचे होणार जतन, संवर्धन

जुन्या लुप्त होणाऱ्या नाटकांच्या डिजिटलायजेशनसह पुनरुज्जीवन करणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : युट्यूब, ओटीटी अन्‌ मल्टीप्लेक्सच्या या काळात नाट्यप्रेमींचा वर्ग ठराविकच होत चालला आहे. एकीकडे राज्यातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृह बंद होत असताना दुर्मीळ मराठी नाटकेही लुप्त होताना दिसत आहेत. यामुळे या नाटकांचे जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने विशेष समिती नेमली आहे.

मराठी रंगभूमीला दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी अनेक जुनी व दर्जेदार नाटके कालौघात लुप्त झाली. याबरोबर त्या काळातील कलाविष्कारही पडद्याआड गेल्याने त्या कलाकृती पुन्हा उपलब्ध होणे शक्य होत नाही. त्या दर्जेदार नाटकांच्या कलाकृती (जुन्या व नव्या) पुनरुज्जीवित करून त्या डिजिटलायजेशनच्या माध्यमातून जतन करण्याचा निर्णय नुकताच सांस्कृतिक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे, लुप्त होणाऱ्या जुन्या नाटकांचा आस्वाद

दुर्मीळ मराठी नाटकांचे होणार जतन, संवर्धन नाट्यप्रेमींना घेता येईल. सोबतच, भावी पिढ्यांना त्या काळातील उत्कृष्ट कलेचे ज्ञान होईल व सहजरित्या उपलब्धही होईल. या नाटकांचा भावी पिढीला अभ्यास करता येईल. यातील जुनी नाटके पुन्हा बसवून त्याचे ध्वनिमुद्रण करीत संग्रह केला जाणार आहे.

दीपक करंजीकर आठ सदस्यीय समितीचे अध्यक्ष

दुर्मीळ होत चाललेल्या मराठी नाटकांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने प्रसिद्ध अभिनेते व अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण आठ सदस्यांची समिती नेमली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, संपदा जोगळेकर कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेते विनय येडेकर, डॉ. शिरीष ठाकूर, विघ्नेश जोशी आणि शैलेश चव्हाण यांचासदस्य म्हणून समावेश केला आहे. तर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक समिती सचिव असतील.

आपल्या वारशाचे दस्तऐवजीकरण होत नाही, ही बाब लक्षात घेता शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे. येत्या पाच ते सहा वर्षांत दीडशे ते दोनशे नाटकांचा संग्रह तयार करण्याचा मानस आहे. जुनी संगीत नाटक, प्रायोगिक नाटक याच्या चौकटी, त्यामुळे त्याकाळी बदललेले समाज जीवन, त्याच्या परिणामांचा संग्रह यानिमित्ताने होईल. सांस्कृतिक वारसा, चळवळ अधिक बळकट व वृद्धिंगत होण्यास या निर्णयाची मदत होईल.

-दीपक करंजीकर, प्रसिद्ध अभिनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Rohit Arya Children kidnapped : लहान मुलांना डांबून ठेवलं अन् सगळीकडे रॉकेल ओतलं! कोण आहे रोहित आर्य अन् काय होत्या मागण्या?

बनवाबनवीच्या यशाचं भूत गेलेलं डोक्यात, पण एका बादलीने सचिन पिळगावकरांना जमिनीवर आणलं, व्हिडिओ व्हायरल

Powai Children Kidnap: तब्बल ६ दिवस तो चिमुकल्यांना...; रोहित आर्यने किडनॅप करण्यापूर्वी १७ मुलांना स्वत:कडे कसे बोलावले?

SCROLL FOR NEXT