nagpur mayor Joshi said follow rules otherwise lockdown again. 
नागपूर

तर नाइलाजास्तव पुन्हा लॉकडाउन. नागपूरचे महापौर असे का म्हणाले जाणून घ्या...

राजेश चरपे

नागपूर : "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली. काही बंधने टाकली. दिशानिर्देश आणि नियमांच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. मात्र, ज्या दिवशी लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली. याचाच अर्थ नागरिक नियम पाळत नाही, असे प्रशासनाच्या लक्षात आले.

याची शहानिशा करण्यासाठी महापौर जोशी हे स्वत: बुधवारपासून दररोज दहाही झोनमधील बाजार परिसरात पायी फिरणार आहेत. आज त्यांनी गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या महाल, इतवारी, गांधीबाग परिसरातील बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गिरीश व्यास, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका श्रध्दा पाठक, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

महाल आणि इतवारी परिसरात काही दुकानात अधिक गर्दी असल्याचे आढळून आले. काही दुकानदार स्वत:च मास्क लावलेले नव्हते. अशा ठिकाणी महापौर स्वत: गेले. त्यांना याबाबत जाब विचारला. अशा सर्व दुकानांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंड ठोठावण्याच्या सूचना दिल्यात. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या दुकानांवर महापौरांच्या सूचनेनुसार ऑन द स्पॉट दंड ठोठावण्यात आला. 

नियम न पाळणाऱ्यांवर दंड 
माध्यमांशी संवाद साधताना महापौर जोशी म्हणाले, नागपुरात कोरोनाच्या परिस्थितीवर उत्तमरीत्या नियंत्रण मिळविण्यात आले होते. मात्र, थोडी सवलत दिली त्याचा नागरिकांनी आपल्या परीने अर्थ लावला. व्यापाऱ्यांना नियम पाळण्याचे बंधन घालण्यात आले होते. ते पाळल्या जाते की नाही, हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दुर्दैवाने तसे झाले नाही. म्हणून आपण स्वत: मनपा प्रशासनातील अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्या सोबत मुद्दाम बाजार परिसरात फिरून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करीत आहोत. 

दिशानिर्देशांचे पालन करा

शहरात पुन्हा लॉकडाउन लावायचा की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाइलाजास्तव पुन्हा प्रशासनाला लॉकडाउन घोषित करावा लागेल. त्यामुळे कोरोनासंदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा. नियम पाळा. लॉकडाउन पुन्हा लादण्याची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT