नागपूर

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

सकाळ वृत्तसेवा

यंदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भोंगळ कारभाराच्याही मर्यादा पार केल्याचे दिसून येत आहे.

नागपूर: महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से चवीने चघळले जातात. परंतु यंदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भोंगळ कारभाराच्याही मर्यादा पार केल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागात पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. एवढेच नव्हे दोन वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यालाही आपत्कालीन विभागात पाठविण्याचा प्रताप अतिक्रमण विभागाने केला होता.

महापालिकेच्या आपत्कालीन विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पावसाळ्यात विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली जाते. संकट काळात नागरिकांना तत्काळ सेवा देण्याच्या उद्देशाने आपत्कालीन विभागाने वेगवेगळ्या चमू तयार केल्या. या चमूमध्ये २२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची १ जूनपासून या विभागात कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहेत.

यंदा अतिक्रमण विभागातर्फे आपत्कालीन विभागासाठी हवालदार अनिल चौहान आणि प्रभाकर आंबेकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे विभागाला कळविले. जून ते सप्टेंबर या कालावधीत हे दोन्ही कर्मचारी सकाळी ८ ते ८ या काळात सेवेवर राहणे अनिवार्य होते. परंतु ते अनुपस्थित होते. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यादी पाठविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे सांगितले.

अनुपस्थितीमुळे आले उघडकीस

आपत्कालीन विभागाचे संचालन करणाऱ्या अग्निशमन विभागाला हे दोन्ही कर्मचारी सेवेवर आलेच नसल्याचे लक्षात आले. यासंबंधी चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. यात चौहान यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे पुढे आले. तर आंबेकर हेसुद्धा सेवानिवृत्त झाले असल्याचे कळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandar Kiwale Statement: ''शुभमदादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला.. आम्हीच कात्रजचे राजे'' हल्ला केल्यानंतर आरोपींनी शुभमच्या नावाने फिरवला कोयता

आमदाराच्या लेकीच्या लग्नाला ४ लाख लोक, पत्रावळ्या हवेत फेकून वाटण्याची वेळ; जेवण हातानेच वाढून घेतलं, प्रचंड गर्दीमुळे गोंधळ

Chandoli Tiger Project : चांदोली अभयारण्यात वाघांचे साम्राज्य बहरणार! वाघांच्या खाद्यासाठी वन विभागाची मोठी मोहीम; सागरेश्वरमधून होणार तब्बल 200 हरणांचे स्थलांतर

Latest Marathi News Live Update : पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिवसभरात ५ विभागांच्या बैठका होणार

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला

SCROLL FOR NEXT