NIA
NIA esakal
नागपूर

Nagpur : चार ठिकाणी ‘NIA’च्या छाप्याने वातावरण तंग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘गझवा ए- हिंद’ हा कट्टरवादी संकल्पनेचा विचार पसरविणाऱ्यांशी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या नागपूरसह ग्रामीण भागातील चौघांकडे गुरुवारी (ता.२३) पहाटे चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) एकाच वेळी छापे टाकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. चार तास चाललेल्या कारवाईत चौघांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती आहे.

फरहान अली लियाकत अली (गवळीपुरा), अख्तर रजा मोहम्मद मुख्तार रैन, अब्दुल मुस्ताबिर अब्दुल मुस्तफा रिजवी (दोन्ही रा. सतरंजीपुरा), जमिल कुरेशी (मांढळ, कुही) अशी तपास करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा, लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सतरंजीपुरा येथील बडी मशिदीजवळ आणि कुही ठाण्याच्या हद्दीतील मांढळ या गावात एकाच वेळी तपास यंत्रणेच्या पथकानी धडक कारवाई केली.

पथकाने चार तास चौकशी करून फरहान अली याच्याकडून मोबाईल, अख्तर रजा आणि अब्दुल मुस्ताबीर यांचा चार ठिकाणी ‘एनआयए’चे छाप्याने वातावरण तंग मोबाईल आणि लॅपटॉपसह काही कागदपत्रे ताब्यात घेतली.

अख्तर रजा आणि अब्दुल मुस्ताबीर हे दोघेही ऑटोचालक असून फरहान अली याचा संत्रा मार्केटमध्ये फळ विक्रेता आहे. याप्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती असून त्यांना नोटीस बजावून ६ एप्रिलपर्यंत लखनऊ येथील कार्यालयात हजर राहण्याची तंबी दिली आहे.

जुलैत पाटणा येथे गुन्हा

‘गझवा ए- हिंद’ या अभियानात सहभागी असलेल्यांवर कारवाई करीत २२ जुलैला बिहार येथील पाटणा शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एक जण मारला गेला होता. याच्याशी संबंधित युवक इंटरनेट आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती घेत होते. ‘एनआयए’ने त्यांची चौकशी सुरू केली होती. त्यातूनच गुरुवारी छापे टाकल्याची माहिती आहे.

देशात कट्टरवाद निर्माण करीत २०३४ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गझवा ए- हिंद’ या अभियानाद्वारे भारत देशातील युवकांना हेरून त्यांच्यामार्फत इंटरनेट आणि व्हॉट्स ॲपच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रचार करते. त्यातून देशातील मुस्लिम युवकांमध्ये कट्टरवाद निर्माण करीत त्यांच्या माध्यमातून देशविघातक कारवाया करीत असल्याचेही समोर आले आहे. त्याचा पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशीही संबंध असल्याची माहिती आहे.

फरहानवर चोरीचे गुन्हे

नागपूर ः एनआयएने गवळीपुऱ्यात छापा टाकून चौकशी केलेल्या अली लियाकत अली याच्यावर तहसील ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय सतरंजीपुऱ्यातील अब्दुल आणि अख्तर यांनाही काही दिवसांपूर्वी लकडगंज पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती समोर आली आहे.

फरहान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने परिसरात चोरी केल्याप्रकरणी त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सतरंजीपुरा येथील बडी मशीद परिसरात राहणारे अख्तर रजा मोहम्मद मुख्तार रैन आणि अब्दुल मुख्ताबिर अब्‍दुल अब्दुल मुस्तफा रिझवी यांनी यापूर्वी मशिदीमध्ये इफ्तार दरम्यान राडा केल्याची माहिती समोर आली.

फरहानवर चोरीचे गुन्हे

त्यातून त्याला चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. याबाबत लकडगंज पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी दुजोरा दिला. दोघेही गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले होते. ते दोघेही या मशिदीच्या समितीवर येण्याचा प्रयत्न करीत, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT