नागपूर पोलिस अलर्ट; शहरात फ्लॅग मार्च sakal
नागपूर

नागपूर पोलिस अलर्ट; शहरात फ्लॅग मार्च

शंभर पोलिस अमरावतीला रवाना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अमरावती शहरात उसळलेली दंगल, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना लक्षात घेता शहर पोलिस दल अलर्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वात शहरभर पोलिसांनी ‘फ्लॅगमार्च’ केला. तसेच कोणत्याही स्थितीसाठी शहर पोलिस सज्ज असल्याचे संकेतही पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

अमरावती शहरात दोन गट आमने-सामने आले होते. त्यानंतर दुकानांची जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. तणावाची ही स्थिती लक्षात घेता नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस दलाला अलर्ट मोडवर ठेवले आहे. शनिवारी सायंकाळी सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि शहरातील सर्वच पोलिस उपायुक्तांसह सहायक पोलिस आयुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीची बैठक घेतली. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. तसेच शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, हॉटेल्स, ढाबे सक्तीने वेळेवर बंद करण्याचे निर्देश दिले.

शहरातील जवळपास ३१ संवेदनशील ठिकाणांवर शस्त्रधारी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिस नियंत्रण कक्षात राखीव पोलिस दलाच्या तुकड्या शस्त्रासह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. फ्लॅगमार्च काढून शहरवासीयांना शांततेचा संदेश पोलिस देणार आहेत. सहा आरसीपी पथके आणि पाच क्युआरटी पथकांना चोवीस तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच शहरातील घडामोडींवर साध्या वेशातील पोलिस लक्ष ठेवून आहेत. धार्मिक संघटनांची संमेलने, राजकीय पक्षांच्या बैठका, कार्यकर्ता मेळावे इत्यादींवर पोलिसांनी ‘वॉच’ राहणार आहे.

अमरावती शहरातील दंगल स्थिती लक्षात घेता मदतीसाठी सहायक पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात ५ पोलिस निरीक्षक, १० सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह शंभर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक अमरावती शहरात पाठविण्यात आले आहे.

सोशल मीडियावरही ‘वॉच’

अमरावती शहरात उसळलेल्या दंगलीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नागपुरात सोशल मीडियावर फिरत आहेत. प्रक्षोभक आणि हिंसाचाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर नागपूर सायबर पोलिसांनी ‘वॉच’ ठेवला आहे. कोणत्याही प्रकारचे हिंसक आणि तथ्यहीन वृत्त सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corruption Case : हॉस्पिटल ते स्मशानभूमी, सगळीकडे मागितली लाच; मुलीच्या मृत्यूनंतर निवृत्त अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा धक्कादायक अनुभव

Jayant Patil : जयंत पाटील यांच्‍या भूमिकेने आघाडीत बिघाडी?, थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने अनेकजण नाराज

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

Prahlad Salunkhe-Patil: सुषमा अंधारे, मेहबूब शेख यांच्या मागे रामराजेंचा हात: भाजपचे नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांचा आराेप

SCROLL FOR NEXT