नागपूर

Nagpur Railway Station: रेल्वे स्थानकावर पार्किंगची जागा अपुरी! प्रवाशांना होतोय मनस्ताप, गाडी ठेवणंही झालं अवघड

मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या अत्याधुनिकतेवर भर दिला जात असताना दुचाकी स्वारांना गाडी पार्किंग करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Central Railway Station: मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या अत्याधुनिकतेवर भर दिला जात असताना दुचाकी स्वारांना गाडी पार्किंग करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. गाड्यांची वाढती संख्या आणि अपुऱ्या जागेमुळे पार्किंगला जागा मिळत नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

मुख्य रेल्वे स्थानकावर दिवसभर मोठी वर्दळ असते. तिकीट काढणारे, प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे किंवा त्यांना घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यातील बहुतांश लोक दुचाकीने रेल्वे स्थानावर येत असतात.

त्यामुळे पार्किंग स्टँण्ड नेहमीच हाऊसफूल असते. यात पार्किंगचे कंत्राट चालविणाऱ्यांचे चांगलेच फावते. दहा रुपयांचे पार्किंग शुल्क वीस रुपये घेऊन नागरिक व प्रवाशांची लुट केली जात होती. याबाबत अनेकदा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. आता कंत्राटदाराची पार्किंग नसली तरी रेल्वे प्रशासनाकडून पार्किंग स्टँण्ड चालविले जात आहे.(Latest Marathi News)

त्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. सध्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने स्थानकाच्या समोरील जागेवर भूमिगत पार्किंगचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. चार चाकी सोबतच आता दुचाकी पार्किंगला जागा अपुरी पडत आहे. गाडी स्टँण्ड नेहमीच पार्किंग हाऊसफूल होत असल्याने स्थानकावर येणाऱ्यांना गाडी लावायला जागाच उपलब्ध राहत नाही.

त्यामुळे बहुतांश वेळ दुचाकी कुठे पार्क करावी? असा प्रश्न पडत असून जागा शोधण्यातच नागरिक व प्रवाशांचा वेळ जात आहे. याकारणाने रेल्वे सुटण्याची सुद्धा भीती प्रवासी व त्यांना सोडायला येणाऱ्या नागरिकांना आहे. पार्किंगच्या नावावर प्रचंड मनस्ताप नागरिकांना सोसावा लागत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT