Nagpur sakal
नागपूर

Nagpur : नागपूरात पाऊस व ढगाळी वातावरण; हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट

पाऊस व ढगाळी वातावरण आणखी दोन दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : रुणराजाने प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत शुक्रवारी उपराजधानीत दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी वादळी पाऊस बरसला.

पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झाले होते. पाऊस व ढगाळी वातावरण आणखी दोन दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. (Nagpur rain update Weather Forecast yellow alert )

‘वेस्टर्न डिस्टर्बन्स''मुळे सध्या विदर्भासह मध्यभारतावर ढगांची दाटी झाली आहे. दुपारपर्यंत ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ चालल्यानंतर अचानक दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वादळ सुटले व काळेकुट्ट ढग दाटून आले.

पाहता-पाहता विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. अगदी बेसा, बेलतरोडीपासून वाडीपर्यंत आणि गोधनीपासून वर्धा रोडपर्यंत शहरात जवळपास सगळीकडेच हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे जागोजागी पाणी साचले होते. नागरिकांचीही तारांबळही उडाली. छत्री व रेनकोट नसल्याने अनेकांना ओल्या अंगाने घरी परतावे लागले.

भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे धुमशान

शहरात काही काळासाठी अंधार पडल्याने वाहनधारकांनाही हेडलाईट सुरू करून वाहने चालवावी लागली. सायंकाळपर्यंत ढगांचा कडकडाट व पावसाची रिपरिप सुरूच होती.

उकाड्यापासून दिलासा

पावसामुळे तापमानात घट झाल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता. परिणामतः नागपूरकरांना ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून नागपूर व विदर्भातील कमाल तापमान ३५ ते ४० अंशांच्या घरात होते. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली.

शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ११.४ मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असल्यामुळे ''विकेंड''पर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सोमवारनंतर हळूहळू उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

शहरात शिमला, उंटीचा ‘फील'

पावसामुळे भर उन्हाळ्यात शहरातील वातावरण आल्हाददायक बनले होते. अगदी शिमला, उंटी व कुलू मनालीसारखा फिल नागपूरकरांना अनुभवायला मिळाला. वातावरण गारेगार झाल्याने अनेकांनी विशेषतः तरुणाईने घराबाहेर पडून वातावरणाचा आनंद घेतला.

तर काहींनी सार्वजनिक सुटी असल्याने घरीच निसर्ग एन्जॉय केला. पाऊस थांबल्यानंतर फुटाळा व अंबाझरी परिसरात तरुण-तरुणींची गर्दी पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT