st bus employee sakal media
नागपूर

नागपूर : एसटी कर्मचारी कामावर परतण्याच्या मार्गावर

अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, नेते गेले, संपकरीच उरले!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या दीड महिन्यापासून संपावर असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन नागपूर आगारातील अधिकाऱ्यांनी केले. संपकऱ्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन भावनिक आवाहन केल्यानंतर येत्या दोन दिवसांत शेकडो कर्मचारी परतण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे नागपूर विभागातून एसटी पूर्वीसारखी धावू लागेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

संप मागे घेण्यावरून संघटना व कर्मचाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. नेत्यांनी संपातून हातवर केल्याने आता फक्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन उरले आहे. सोमवारीही एका संघटनेने संपातून माघार घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.

संप मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी संपकरी कर्मचारी कामावर परतले नाही. संपकऱ्यांची दिशाभूल होत आहे. त्यांच्यातील संभ्रम दुर करावा या हेतूने यंत्र अभियंता (चालन) नागुलवार आणि विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी घाटरोड आणि इमामवाडा आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांकडे प्रत्यक्ष जावून त्यांचे मार्गदर्शन केले.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने बहुतांश कर्मचाऱ्यांत सकारात्मक उर्जा संचारली. मात्र, गणेशपेठ आणि वर्धमाननगर आगारात संपकरी न मिळाल्याने त्यांना मार्गदर्शन करता आले नाही. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील सावनेर, उमरेड, रामटेक आणि काटोल आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या आंदोलनस्थळी जावून अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

विभागीय अभियंता, यंत्र अभियंता, वाहतूक अधिकारी यांचा समावेश होता. त्यामुळे दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परततील, अशी शक्यता आहे. विनाकारण प्रवाशांना वेठीस धरू नका. कुटुंबासाठी तरी कामावर परता, अशा भावनिक शब्दात अधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले. त्याला संपकरी कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

३ कामगार परतले, १४ बस धावल्या

वर्धमाननगर आगारातील एक चालक आणि गणेशपेठ व इमामवाडा आगारातील दोन वाहक असे तीन कर्मचारी मंगळवारी कामावर परतले. तर नागपूर विभागातून मंगळवारी १४ बसगाड्या धावल्या. एकूण ४२ फेऱ्या झाल्या असून १५१३ प्रवाशांनी प्रवास केला. विभागाला ९४६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशपेठ - ४, घाटरोड - ३, इमामवाडा- ३ उमरेड - २, वर्धमान- १ आणि रामटेक आगारातून एक बस धावली, अशी माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात गारठा वाढला, ७ जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा; तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

UP Gangster Act : गांधींच्या फोटोवर गोळी आणि गोडसेचे गुणगान! महामंडलेश्वर पूजा पांडेवर UP पोलिसांनी का लावला 'गँगस्टर' कायदा ?

Nagpur Yuva Protest : ‘युवा कार्य’ च्या मोर्चात चेंगराचेंगरी; पोलिसांचा लाठीमार; २५ आंदोलनकर्ते जखमी!

Golden Bhelpuri House : आठ दशकांचा स्वाद वारसा; गोल्डन चटणीने मुंबईच्या भेळेला दिलं वेगळेपण

Coupe Car Body Style : स्टाइल, वेग आणि लक्झरीचं परफेक्ट मिश्रण; ‘कुपे’ मोटारींचा अद्वितीय प्रवास

SCROLL FOR NEXT