tiger  sakal
नागपूर

Nagpur : माथनी, भामेवाडा शिवारात वाघाची दहशत; नऊ गाईंची शिकार बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

दोन महिन्यांपासून वाघ जनावरांवर हल्ले करीत आहे. आतीपर्यंत नऊ गाईवर हल्ला झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मौदा - मौदा तालुक्यातील माथनी व कामठी तालुक्यातील भामेवाडा, चिकना, जाखेगाव, रानमांगली शेतशिवारात उंबरपेठ जंगलातील पट्टेदार वाघाने बकरी व नऊ गाईची शिकार केली. शिवारांत धुमाकूळ घातल्याने शेतकरी व गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. ह्याच वाघाचे हल्ला केल्यामुळे रानमांगली येथील प्रशांत शेंडे यांच्या गाईचा शनिवारी मृत्यू झाला.

माथनी व भामेवाडा शेतशिवारात दिलीप बांगळे हे सकाळी आपल्या शेतात जात असताना त्यांना वाघ दिसला. त्यांनी लगेच इतर शेतकऱ्यांना याची माहिती दिली. परंतु काही वेळातच नाल्याच्या बाजुला घनदाट झुडपात वाघ गायब झाला. मात्र त्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसल्याने तो नाल्यात पाणी पिण्याकरिता गेल्याचे लक्षात आले. मौदा, कामठी व कुही तालुक्यातील शेतशीवारात हा वाघ जनावरांची शिकार करीत आहे. हे तीनही शेतशिवार लागून आहेत. ही वन विभाग कुही येत असल्यामुळे वनरक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

काही भागात कॉमेरा लावण्यात आलेला आहे . त्यात हा वाघ येताना व जाताना दिसत आहे. ह्या शेतशिवाराला लागन कन्हान नदीचे पात्र असल्यामुळे वाघाला मुक्काम करण्यासाठी सोईचे ठरत आहे. त्यामुळे वाघ आठ दिवसात दोन - तीन शिकार करीत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

दोन महिन्यांपासून वाघ जनावरांवर हल्ले करीत आहे. आतीपर्यंत नऊ गाईवर हल्ला झाला आहे. त्यातील सहा गाईंचा मृत्यू झाला व तीन गाई गंभीर जखमी आहेत. आज प्रशांत शेंडे यांचा गाईचा पंचनामा करण्यात आला आहे. हे प्रकरण नुकसाभरपाईसाठी शासनाकडे पाठवित आहे.

-एन एम पिपरे, वनरक्षक, खोबना बीट, कुही.

उंबरपेठ जंगलात वास्तव्य

कुही तालुक्यातील उंबरपेठ जगलात वास्तव्य असल्याचे वनरक्षक एन एम पिपरे यांनी सांगितले. कुही तालुक्यातसुद्धा या वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. परंतु तिकडे येणारा वाघ हाच आहे का हे निश्चित सांगता येत नाही. शेतकऱ्यांची जमीन जगलांना लागून असल्यामुळे शेतकरी जनावरे आपल्या शेतात नेतात. परंतू वाघाचे हल्ले होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रानडुक्कराची शिकार

माथनी शिवारात ऊसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जात असल्यामुळे येथे रानडुकरांचा हैदोस आहे. रानडुकरांची शिकार वाघ जास्त करीत आहे. माथनी येथील सरपंच श्याम वाडीभस्मे हे गुरुवारला शेतात गेले असता वाघाच्या पायाचे ठसे त्यांना दिसले व ऊसाच्या शेतातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. तेथे रानडुक्कर मरून असल्याने रानडुकराची वाघाची शिकार केली असावी असे बोलले जात आहे.

मी मंगळवारी सकाळी स्वतः वाघ पाहिला. त्यामुळे शेतात जाण्याकरीता भीती वाटत आहे. गाई आणि बकऱ्या चारायला दररोज न्याव्या लागतात. त्यातच शेतीची कामेही करावी लागतात. त्यामुळे वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा.

दीपक बांगळे, शेतकरी भामेवाडा.

पंधरा दिवसापूर्वी मी गाई व बकऱ्या चारायला नेल्या होत्या. वाघाने गाईच्या मागच्या पायाचा चावा घेतला. भूगाव येथील पशुवैद्यक तज्ज्ञांच्या माध्यमातून औषधोपचार केला, परंतु आज गाईचा मृत्यू झाला.

प्रशांत शेंडे, शेतकरी रान मांगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT