Nagpur News  Esakal
नागपूर

Nagpur Crime: मद्यधुंदीत मित्रानींच केला ‘गेम’, कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, हत्येचं कारण समोर

मित्रांमध्ये दारू, गांजाची ओली पार्टी घरी सुरू असताना जुन्या वैमनस्यातून एका मित्राने दुसऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेकडी वाडी भागात मंगळवारी दुपारी घडली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime Young boy Killed by Friends: मित्रांमध्ये दारू, गांजाची ओली पार्टी घरी सुरू असताना जुन्या वैमनस्यातून एका मित्राने दुसऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेकडी वाडी भागात मंगळवारी दुपारी घडली. लिखित ऊर्फ लकी घनश्याम आडे (२८) रा. साईनगर, दाभा असे मृताचे नाव आहे.

लकीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर एक हत्या व अनेक किरकोळ गुन्हे दाखल आहेत. टेकडी वाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला विक्की विष्णू लोखंडे याच्या घराच्या वरच्या मजल्यावर लकी व त्याचे दहा ते बारा मित्र दारू-गांजा पीत बसले होते. तेव्हा जुन्या वैमनस्यातून मित्रांनीच लकीसोबत वाद घातला. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाड, इतर धारदार शस्त्राने वार केले. बॉटल्स डोक्यावर फोडल्या व आरोपी पसार झाले. घटनास्थळीच लकीचा मृत्यू झाला.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. सूचना मिळताच पोलिस उपायुक्त अनुराग जैनसह पोलिस अधिकारी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. लकीला गांजा व दारूचे व्यसन जडले होते. सर्व मित्रमंडळी रोजच विक्कीच्या घरी बसून व्यसन करीत होते. मित्रांमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. या व्यवसायातूनच वाद निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. वाडीमध्ये गांजा विक्री व तस्करी वाढल्याचा आरोप केला जात आहे.

मनसोक्त दारू पाजून केले युवकावर चाकूचे वार

दारूच्या नशेत मित्राला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुळवडीच्या पूर्वरात्री घडली. आयूष नंदलाल गणवीर (२०) रा. हनुमाननगर, पारडी, असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी आयूषच्या तक्रारीवरून त्याचा आरोपी मित्र राहुल मांढरे (२४) रा. उमरेड विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

राहुल आणि आयूष हे दोघे चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी मद्यप्राशन करीत असताना शिवीगाळ केल्यावरून दोघांत हाणामारी झाली. राहुलच्या मनात याची खदखद होती. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास राहुलने आयूषला फोन करून दारू पिण्यासाठी बोलावले. पारडीत दोघांचीही भेट झाली.

त्याला भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. तेथे त्याला मनसोक्त दारू पाजली. त्याच्या पोटात चाकू भोसकून फरार झाला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पारडी पोलिस पोहोचले. गंभीर जखमी अवस्थेत आयूषला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT