nagpur z p transferred  teachers to needy school
nagpur z p transferred teachers to needy school  
नागपूर

शिक्षकांना जिल्हा परिषदेचा धक्का! शहरात ठाण मांडून बसलेल्यांचे इतरत्र समायोजन

नीलेश डोये

नागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शिक्षक कार्यरत आहेत. परंतु, आता या शिक्षकांना धक्का देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. शहरातील १४ शिक्षकांचे समायोजन गरज असलेल्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. हे समायोजन टाळण्यासाठी काही संघटनांकडून राजकीय दबाव आणण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पटवर्धन हायस्कूल ही वर्ग ५ ते १२ पर्यंतची शाळा आहे. या शाळेतील ५ ते १० पटावर केवळ २ विद्यार्थी असून सहा शिक्षक आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच ही स्थिती आहे. येथील २ विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन केल्यास ९ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरतात. त्यामुळे या शिक्षकांचे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळेतील रिक्त पदांवर समायोजन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याचसोबत काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ८ पदे मान्य असून १७ शिक्षक कार्यरत आहे. पट संख्येच्या तुलनेत ८ शिक्षक अतिरिक्त आहे. शिक्षक संघटनांशी संबंधित वजनदार शिक्षक हे शहर आणि शहरालगतच्या शाळेत असल्याचे सांगण्यात येते. जि.प. हायस्कूल जवळी येथे ६ शिक्षक मान्य असून ८ पदे कार्यरत आहेत. जि.प. हायस्कूल पाचगाव, बोथिया पालोरा, हिंगणा, मांढळ, कोंदामेंढी या शाळांमध्ये मान्य पदांपेक्षा कार्यरत पदांची संख्या जास्त आहे. 

समायोजनाची प्रक्रिया आज -
पट संख्येअभावी बंद होणाऱ्या शाळांधील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ५२ शिक्षकांचे समायोजन करण्यात करण्यात येणार आहे. माध्यमिक शाळांमधील १४ शिक्षकांचे प्राथमिक विभागात समायोजन करण्यात येणार आहे. समायोजनाची प्रक्रिया गुरुवारला होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT