Nagpurkars, do this to avoid lockdown 
नागपूर

नागपूरकरांनो, लॉकडाउन टाळण्यासाठी हे करा!, वाचा सविस्तर...

राजेश प्रायकर

नागपूर :शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येचे खापर महापालिकेने नागरिकांच्या उद्दामपणावर फोडले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना नियमाने वागण्यासंदर्भात चार दिवसांचा "अल्टिमेटम' दिला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी नियम पाळण्याबाबत गंभीर होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. असे व केल्यात नागपूरकरांना पुन्हा लॉकडाउनचा सामना करावा लागू शकतो. लॉकडाउन टाळायच असेल तर खालील नियम पाळणे गरजेचे झाले आहे. 

शहरात कोरोनाबाघितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काहीकेल्या यावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. तसेच मृतांची वाढती संख्या चिंतेत भर घालनारी आहे. यामुळेच शहरात पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याची चर्चा आहे. चार महिण्यांच्या काळानंतर नागरिकांचे जीवन रुळावर येण्यास सुरुवात झाली असताना पुन्हा लॉकडाउनचे संकट डोक्‍यावर उभे झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी आता नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

केवळ लॉकडाउनच नव्हे तर स्वतः तसेच कुटुंबीय, घरातील लहान मुले यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्‍यक झाले आहे. नागरिकांप्रमाणेच दुकानदार, रेस्टॉरंट संचालकांनीही नियमावर बोट ठेऊन ग्राहकांना वागणूक देण्यासाठी आगेकूच केल्यास लॉकडाउन टाळता येणार असल्याचे इंटरनॅशनल स्कील डेव्हलमपेंट सोसायटीचे अरशद तनवीर खान यांनी सांगितले. 

लॉकडाउन टाळण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन कराच, शिवाय महापालिका, महावितरण, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर केल्यास बाहेर निघण्याची गरज पडणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. चला तर नियमांचे पालन करूया आणि कोरोनाला हरवूया. असे केल्यास पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही.

असे टाळा बाहेर जाणे 

  • व्यायामाच्या हेतूने बाहेर फिरणाऱ्यांनी घरीच व्यायाम व योग करा 
  • बाजाराचा वापर टाईमपाससाठी करण्याऐवजी आठवड्याभराचा भाजीपाला घरी आणा 
  • रेस्टॉरंटचालकांनी केवळ पार्सलची सुविधा सुरू ठेवावी. 
  • टॅक्‍स भरण्यासाठी महापालिकेच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करा 
  • वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करा 
  • समस्येच्या तक्रारीसाठी महापालिकेच्या ऍपचा वापर करा 
  • बाहेर जाण्याची गरज असेलच तर एकाच व्यक्तीने बाहेर पडावे. 
  • बाहेरून आल्यानंतर कपडे धुण्यास टाकावे, शॉवर घेतल्यानंतरच कुटुंबात मिसळावे. 
  • दुधासाठी बाहेर जाण्याऐवजी दुधाची भुकटी वापरावी. 
  • खाद्यान्न पदार्थ मागविण्यासाठी ऑनलाईन ऍपचा वापर करावा. 
  • ब्रेडचा वापर टाळून घरीच पराठा आदी तयार करावा. 
  • अत्यावश्‍यक कार्यासाठी बाहेर पडत असल्याचा पुरावा असलेल्यांनाच पेट्रोलपंप संचालकांनी पेट्रोलचा पुरवठा करावा. 
  • नेहमीच्या किराणा दुकानदारांना फोन, मोबाईल क्रमांकावर संपर्क करून किराणा आदी मागवावा. 
  • कार्यालयात जाण्याचा मोह टाळून शक्‍यतोवर "वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य द्यावे. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT