Mahavikas Aghadi sakal
नागपूर

राष्ट्रवादी-शिवसेनेचे भाव वाढले; आघाडीसाठी काँग्रेसवर दबाव

राजेश चरपे

नागपूर : पाच राज्यांमध्ये काँग्रेस पराभूत झाल्याने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (Shiv Sena) आपले भाव वाढवले आहे. महाविकास आघाडी करून आमच्यासाठी प्रत्येकी २५ जागा सोडाव्यात अशी मागणी आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.

नागपूर शहरात राष्ट्रवादी (Nationalist Congress) आणि शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे काँग्रेस नेते त्यांच्यासोबत महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास इच्छुक नाही. तसे संकेतही स्थानिक नेत्यांनी यापूर्वी दिले आहे. राष्ट्रवादीचा एक तर शिवसेनेचे (Shiv Sena) दोनच नगरसेवक शहरात आहेत. त्यामुळे स्वबळावर लढावे निकालानंतर आघाडी करावी असा फॉर्म्युला काँग्रेसने दिला आहे. मात्र, महाविकास आघाडीवर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.

पाच राज्यांतील निवडणुकीने काँग्रेस (Congress) कमजोर झाली असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे समविचारी तसेच महाविकास आघाडीतील पक्षांना सोबत घेणे किती गरजेचे आहे याकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे स्थानिक नेते लक्ष वेधले. पंधरा वर्षांपासून काँग्रेस महापालिकेच्या सत्तेबाहेर आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास भाजपचा सामना करता येईल. भाजपला पराभूतसुद्धा करता येईल. त्यासाठी काँग्रेसला हट्ट सोडावा लागेल.

राष्ट्रवादी (Nationalist Congress) आणि शिवसेनेचे काही पॉकेट्स आहेत. काँग्रेसची सोबत राहिल्यास येथून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात. उर्वरित जागेवर आमच्या पक्षाची मते विभाजित होणार नाही, त्यामुळे काही मतांच्या अंतराने पराभूत होणारे काँग्रेसचेही उमेदवार निवडून येऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी-सेनेच्यावतीने केला जात आहे.

बेरजेचे राजकारण महत्त्वाचे

भाजपला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी काँग्रेसने (Congress) पुढाकार घेण्याची गरज आहे. दोन पावले मागे घेतल्यास आणि महापालिकेत महाविकास आघाडी सत्तेत आल्यास याचा काँग्रेसलाच सर्वाधिक फायदा होणार आहे. पाच पंचवीस जागेच्या मोहासाठी सत्तेतून दूर राहण्यात शहाणपण नाही. शेवटी ही निवडणूक आहे. येथे बेरजेचे राजकारण करावे लागते. भाजपने आजवर तेच केले. त्यामुळे मागील निवडणुकीत त्यांची एकहाती सत्ता आली. यापासून काँग्रेसने धडा घ्यावा असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्याने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT