nearly 75 thousand students will appeared for final year exams in nagpur 
नागपूर

आता कोरोना घेणार चक्क विद्यापीठाचीच परीक्षा.. चांगलाच लागणार कस; वाचा सविस्तर 

मंगेश गोमासे

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.२८) अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर विद्यापीठ कामाला लागले आहे. परीक्षा घेण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची तयारी पूर्ण असून अंतिम वर्षात ७५ हजारावर विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा र्निविघ्न पार पाडण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा चांगलाच कस लागणार आहे.

कोरोनामुळे देशभरात असलेल्या टाळेबंदीमुळे महाविद्यालय आणि विद्यापीठाचे कामकाज बंद करण्यात आले. त्यानंतर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्यात. परीक्षेतील अनिश्‍चितेमुळे विद्यार्थी मानसिक तणावात होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने परीक्षा घेऊ नये असा पवित्रा घेतल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. यावर अनुदान आयोगाने पहिल्यांदा सोयीनुसार परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. 

मात्र, त्यात अचानक बदल करुन आयोगाने परीक्षा घेण्याचे आदेश काढले. यावरुन युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी घेत, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले. परीक्षबाबत कुठलही निर्णय आला तरी विद्यापीठाकडून परीक्षेची पूर्ण तयारी करण्यात आली होती. आता निर्णय आल्याने विद्यापीठ कामाला लागले आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात विद्यापीठ र्निविघ्न परीक्षा पार पाडण्यासाठी विद्यापीठाचा चांगलाच कस लागणार आहे.

केंद्रांच्या संख्येत होणार वाढ

विद्यापीठाच्या परीक्षेसाठी परीक्षा मंडळाकडून जवळपास १३१ केंद्रांची तयार करण्यात आलेली आहेत. मात्र, "सोशल डिस्टंसिंग'चा विचार केल्यास विद्यापीठाला किमान दोनशेहुन अधिक केंद्र तयार करावी लागणार आहे. आता विद्यापीठाचा भर नियोजनावर राहणार असून केवळ एक महिना हाती असल्याने परीक्षा मंडळाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण असून सरकारकडून आदेश येताच, परीक्षा मंडळाची बैठक घेऊन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
डॉ. प्रफुल्ल साबळे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर धाव; विकेटही घेतली अन्...

Pune News : एआय आणि डेटाच्या बळावर महाराष्ट्र होणार 'इनोव्हेशन हब'; डॉ. श्रीकांत पाटील यांनी मांडला रोडमॅप!

Latest Marathi News Live Update : भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

Ayodhya Non-veg Ban: मोठी बातमी! अयोध्येत मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी; उल्लंघन केल्यास..., का निर्णय घेतला?

Chandrapur Kidney Racket Case : ''निवडणुकीच्या कामाच्या व्यस्त असल्याने भेटीला येऊ शकलो नाही'', किडनी पीडितांना भेटताच पालकमंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT