New flat waiting for police 
नागपूर

स्वतःचे घर असतानाही पोलिस राहतात भाड्याच्या खोलीत; हस्तांतरण कधी?

अनिल कांबळे

नागपूर : राज्याचे गृहमंत्री, पालकमंत्री आणि पोलिस महासंचालकांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेऊन पाचपावलीतील पोलिसांच्या सदनिकांचे उद्घाटन झाले. प्रातनिधिक स्वरूपात काही जणांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. परंतु, तेथे कोविड सेंटर असल्याने दोनशे पोलिस कुटुंबावर आजही स्वतःचे घर असतानाही भाड्याने राहायची वेळ आली आहे.

नागपूर पोलिस कर्मचारी यांच्या निवासाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाचपावली पोलिस स्टेशनला लागून असलेली जुनी वसाहत तोडून नवीन वसाहत बांधण्यात आली. आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा या ७ इमारती असून १९६ क्वार्टर्स आहेत. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी उद्यान, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि कार्यक्रमासाठी प्रशस्त सभागृहाची सोय सुद्धा येथे करण्यात आली आहे.

पोलिसांच्या बहुमजली वसाहतींचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू झाले होते व २०२० पर्यंत बांधकाम पूर्ण देखील झाले. या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पोलिस महासंचालक हेमंतकुमार नगराळे यांच्या हस्ते २५ जानेवारीला व्हर्च्युअली करण्यात आले. तेव्हा १५ पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते घराच्या चाव्या सोपविण्यात आल्या होत्या. परंतु, आजपर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांना निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. 

कोरोनाबाधितांचा निवास

नागपूर येथे अपुऱ्या जागेचा प्रश्न असल्यामुळे पोलिस प्रशासनाने या इमारतींचा वापर क्वॉरंटाईन सेंटरसाठी करण्याची परवानगी दिली. या ठिकाणी आतापर्यंत या वसाहतीत १,२६३ पेक्षा जास्त कोरोनाबाधितांना व संशयितांना ठेवण्यात आलेले होते. मात्र, आता महिनाभरापासून रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही इमारत पोलिसांना हस्तांतरित केल्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

इमारतीत केली तोडफोड

काही असामाजिक तत्त्वांनी या इमारतींची अवस्था दयनीय करून ठेवली आहे. काही क्वार्टर्स मध्ये पंखे, मॅाड्यूलर किचनचे पल्ले तोडले, तर काही ठिकाणच्या नळ, तोट्या चोरल्या, काही ठिकाणी पांढऱ्या भिंती थुंकून लाल केल्या आहेत. सध्या स्थिती अशी आहे की या वसाहतींची दुरुस्ती झाल्याशिवाय येथे राहणे अवघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT