नागपूर

नागपूरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी रांगा

साईमंदिर, टेकडी गणेश मंदिरासह पार्क, फुटाळाही फुलले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नव्या वर्षांच्या(NEW YEAR) पहिल्या दिवसाची सुरवात देवदर्शनाने करण्यासाठी शहरातील नागरिकांनी आज साई मंदिरासह टेकडी गणेश मंदिरात मोठी गर्दी केली. यावेळी शनिवारचा विकेंड घालविण्यासाठी अनेकांनी सायंकाळी स्वामिनारायण मंदिरासह फुटाळा, महाराजबाग प्राणीसंग्रहालय आणि विवेकानंद स्मारक आणि पार्कमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. यामुळे कोरोना आणि ओमिक्रानची भीती कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हती. (NEW YEAR FIRST DAY PEOPLE CROWD IN TEMPLES IN NAGPUR)

थर्टीफर्स्टला पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकण्यात आले. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी घरातच नववर्षाचे स्वागत केले. मात्र, दुसऱ्या दिवशी दिवसाची सुरवात देवदर्शनाने करण्यासाठी सकाळपासूनच वर्धा मार्गावरील साई मंदिर, तेलंगखेडी, रेल्वे स्टेशन जवळील टेकडी गणेश मंदिर, इस्कॉन मंदिर आणि इतवारीतील राधाकृष्ण, बालाजी मंदिर आदी ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी मंदिर प्रशासनाकडून कोरोना नियमांचे पालन करीत, सामाजिक अंतर पाळून दर्शनासाठी सोय केली होती. यावेळी अनेकांनी देवाच्या साक्षीने नववर्षाचा संकल्प घेताना दिसून आले. याशिवाय दिवसभर दुपारी वातावरणाचा आनंद लुटत अनेकांनी फुटाळा, विवेकानंद स्मारक परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरही फुलला होता. अनेकांनी पहिल्या दिवशी रामटेक, आदासा आणि आसपासच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. दरम्यान शहरातील पार्क आणि उद्यानातही यावेळी गर्दी दिसून आली. याशिवाय सायंकाळी स्वामिनारायण मंदिरातही शहरातील नागरिकांनी हजेरी लावून गर्दी केली होती.

मास्क गायब

देवस्थानांसह अंबाझरी तलाव, महाराजबाग येथे येताना भाविकांनी आणि पर्यटकांना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. शिवाय, व्यवस्थापनाकडून निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित आहे. व्यक्तिश: अंतर तर पाळावेच लागेल, असे फलक लागले आहेत. मात्र, अनेकांच्या चेहऱ्यावरील मास्क गायब झालेले होते. अनेकांचे मास्क हनुवटीला टांगलेले दिसून येत होते.

डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाकडून निर्बंध लावले जात आहे. मात्र, आज देवस्थानांसाठी आलेल्या भक्तांनी आणि पर्यटनासाठी आलेले महाराजबागमधील पर्यटकांनी नियमांची पायमल्ली केली. कोरोनाची भीती कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हती.

संकल्पाचा दिवस

प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असाच विचार सुरू होतो. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे सकाळी देवदर्शन करीत, अनेकजण संकल्प करताना दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT