Nine hundred children in the district are in the shadow of malnutrition 
नागपूर

जिल्ह्यातील नऊशेवर बालके कुपोषणाच्या छायेत

नीलेश डोये

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ९०२ बालके कुपोषणाच्या छायेत आहेत. यात मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ७२६ व अतितीव्र कुपोषित (सॅम) १७२ बालकांचा समावेश आहे. जुलै २०२० च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कुपोषित बालकांची स्थिती घटल्याचा महिला व बालकल्याण विभागाचा दावा आहे. 

जुलै २०२० मध्ये मध्यम तीव्र कुपोषित १,४१७ व अतितीव्र कुपोषित ४२९ अशी तब्बल १,८४६ बालके कुपोषित होती. यात घट होऊन ही संख्या ९०२ वर आली आहे. कुपोषण कमी करण्यासाठी या बालकांना बालविकास केंद्राच्या माध्यमातून एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड (ईडीएनएफ) आहार देण्यात येतो. अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्यांना पोषण आहार दिला जातो.

जिल्ह्यात २,४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यात एक लाख ४१ हजारांवर २८५ बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच पोषण केले जाते. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद करण्यात आल्या; पण बालकांना पोषण आहाराच्या रूपात कडधान्ये त्यांच्या घरी जाऊन पुरविले जात आहे. असे असले तरी जुलैत घेतलेल्या बालकांच्या आढाव्यात कुपोषित मुलांची ही संख्या आता घटली असल्याचे दिसून येत आहे. 

मुलांना कडधान्यांचे वितरण

कोरोनामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण बंद असले, तरी मुलांचे वजन, सीबीई कार्यक्रम व पोषण आहाराचे वितरण सुरू आहे. पूर्वी अंगणवाडीत शिजलेला आहार येत होता. पण, मार्चपासून अंगणवाडी बंद असल्याने कडधान्ये येत आहेत. यात चणाडाळ, मसूरडाळ, तिखट, हळद, तेल, गहू आदींचा समावेश आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT