Manas Agro Industries esakal
नागपूर

Manas Agro Industries : गडकरींच्या लेकांची कंपनी लॉंच करणार रम आणि व्हिस्कीचे ब्रॅंड

नितीन गडकरींच्या 'पूर्ती ग्रुप'पासून दूर गेलेली मानस अॅग्रो आता इथेनॉल बनवण्याबरोबरच मद्य तयार करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नितीन गडकरींच्या 'पूर्ती ग्रुप'पासून दूर गेलेली मानस अॅग्रो आता इथेनॉल बनवण्याबरोबरच मद्य तयार करत आहे.

नागपूर : नितीन गडकरींच्या 'पूर्ती ग्रुप'पासून (Purti Group) दूर गेलेली मानस अॅग्रो इंडस्ट्रीज (Manas Agro Industries) आता इथेनॉल बनवण्याबरोबरच मद्य तयार करत आहे. पूर्ती ग्रुपमधून मानस अॅग्रो आणि सीआयएएन अॅग्रो इंडस्ट्रीज या दोन नवीन संस्था निर्माण करण्यात आल्या. आता या दोन्ही कंपन्या गडकरींचे पुत्र सारंग आणि निखिल चालवतात.

गडकरी (Nitin Gadkari) इथेनॉल (Ethanol) सारख्या पर्यायी इंधनाचे समर्थक आहेत. उमरेड तहसीलमधील बेला येथील मानस साखर कारखान्यातून तयार झालेल्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केलं जातं. त्याच युनिटनं आता कप्तान आणि होल स्टोन नावाचं रम आणि व्हिस्कीचं ब्रँड आणलंय. हे उत्पादन नुकतंच रिटेल आउटलेटमध्ये लाँच करण्यात आलंय.

मानसच्या साखर कारखान्यातील मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या स्पिरिटचा (Spirit) वापर पुढील शुद्धीकरणानंतर अल्कोहोल, तसंच इथेनॉल तयार करण्यासाठी केला जातो. अल्कोहोलचं उत्पादन ही फक्त सुरुवात आहे. यानंतर आता बाजारपेठेत चाचणी घेतली जात आहे, असं कंपनीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. इथेनॉल हे सध्या कंपनीचं मुख्य उत्पादन आहे.

मानस ग्रुपचे संचालक समय बनसोड यांनी सांगितलं की, आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. मद्य देखील स्पिरीटमधून बनवता येत असल्यामुळं कंपनीनं उत्पादनात वैविध्य आणलंय. स्पिरिट हे साखर कारखान्यातून तयार झालेल्या मोलॅसिसपासून बनवलेलं पहिलं उत्पादन आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेमुळं इथेनॉल तयार होतं, जे पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी 99 टक्के पेक्षा जास्त शुद्ध असणं आवश्यक आहे. भारतीय बनावटीची विदेशी मद्य (IMFL) बनवण्यासाठी काही प्रमाणात स्पिरीटचा वापर केला जातो.

सध्या आम्ही फक्त पाण्याची चाचणी घेत आहोत. नंतर जसं उत्पादन स्वीकारलं जाईल, तसं उत्पादन आम्ही वाढवू. महाराष्ट्रातील ब्रँडची विक्री करण्याबरोबरच ते उत्पादन उत्तरेकडील राज्यांमध्येही नेण्याची योजना आहे. रमला विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत तिथं चांगली मागणी आहे. इथेनॉलचं मिश्रण 20 टक्के पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्यामुळं येत्या काही दिवसांत उत्पादनाला मोठी मागणी राहण्याची अपेक्षा आहे. यासाठी 1,500 कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे, असंही बनसोड यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT