Nitin Gadkari said Seventeen hundred crores will be given for Nagandi 
नागपूर

नागनदीसाठी मिळणार सतराशे कोटी; हजार कोटींच्या निविदांना मंजुरी दिल्याची नितीन गडकरींची माहिती

राजेश चरपे

नागपूर : नागनदीतून बोटी चालवण्याचा संकल्प करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागनदीच्या पुनरुज्जीवनासह सोंदर्यीकरणासाठी सतराशे कोटी देण्याची घोषणा केली आहे. नागनदी आणि पुण्यातील मुळा-मुठा नदीसाठी एक हजार कोटींच्या निविदांना मंजुरी देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि समस्या संदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

पुण्यातील मुळा-मुठानदी आणि नागपुरातील नागनदीच्या पुनर्जीवन योजनेतंर्गत विविध कामांचा आढावा याबैठकीत घेण्यात आला. या योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांसाठी  जपानच्या जायका कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदी विकासकामांसाठी १ हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

तर नागनदी विकासकामांसाठी सतराशे कोटी रुपये खर्च येणार आहे. आजच्या बैठकीत  या दोन्ही नद्यांच्या पुर्नरुज्जीवनसंदर्भातील विविध विकासकामांसाठी एक हजार कोटी रुपयांच्या निव‍िदांना मंजुरी देण्यात आली असल्याचे  गडकरी यांनी बैठकीनंतर सांगितले. 

बोटीने प्रवास होणार शक्य?

गडकरी यांनी नागनदीतून बोटीने प्रवासाचा सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आजही अनेकजण अधूनमधून गडकरी यांना नागनदीचे काय झाले असे टोले मारतात. गडकरी यांच्या घोषणेची भाजपचे नेतेही साहेबांचे काही नवीनच असते, असे सांगून गंमत उडवतात. मात्र गडकरी आपल्या घोषणेवर ठाम आहेत. याकरिता विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. नागपूर महापालिकेने तसा सविस्तर आराखडा केंद्र सरकाला सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT