liquor
liquor 
नागपूर

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आली...  तुकाराम मुंढेंनी घेतला हा निर्णय

सकाळवृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने आज ग्रीन, ऑरेंज झोनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सील केलेला परिसर (हॉटस्पॉट) वगळता रेड झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूच्या दुकानांसोबत रस्त्याच्या एका बाजूला असलेली इतर पाच दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. यात दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. परंतु, दारूची दुकाने उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तळीरामांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलासा देण्याचे स्पष्टपणे नाकारले. संत्रानगरी रेड झोनमध्ये असल्याने 17 मेपर्यंत सक्तीने लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले. त्यामुळे राज्य शासनाचे आदेश पाळायचे की महापालिकेचे? अशा संभ्रमात मद्यविक्रेते आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाले. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. राज्य सरकारने ऑरेंज व ग्रीन झोन तसेच सील केलेला परिसर वगळून रेड झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांसोबत रस्त्याच्या एका बाजूकडील स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यासारखी इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्‍यक असणार आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले.

मनपा आयुक्तांनी मात्र नाकारली शिथिलता 
राज्य सरकारचे आदेश प्रत्येकाकडेच पोहोचल्याने मद्यविक्रेत्यांमध्ये व्यवसाय सुरू होणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली. एवढेच नव्हे अनेक मद्यप्रेमींपर्यंतही हे आदेश पोहोचल्याने त्यांनीही "एकच प्याला'ची स्वप्नेही रंगविली. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सायंकाळी नागपूर रेड झोनमध्ये असल्याने येथे कुठलही शिथिलता राहणार नाही. दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, असे आदेश जारी केले. त्यामुळे मद्यप्रेमींसोबतच विक्रेत्यांतही संभ्रम निर्माण झाला. आयुक्तांनी शहरात तीस टक्के कर्मचाऱ्यांसह शासकीय व खासगी कार्यालयेही उघडता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी केवळ बांधकाम कंत्राटदारांना कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यांना कामावरच मजुरांची व्यवस्था करावी लागणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियम कंत्राटदारांना पाळावे लागणार आहे. शहरातील उद्योजकांना उद्योगही सुरू करता येणार नाही. जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांशिवाय दारूची दुकाने किंवा अन्य कुठलीही दुकाने महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाहीत, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. 
 

बंद : दारू, सलून, वाहन स्पेअर पार्टस, हार्डवेअर आदी दुकाने, पानटपरी, हॉटेल, रेस्टॉरंट 

सुरू : औषधी, किराणा, धान्य, डेअरीसह जीवनावश्‍यक वस्तूंची सर्व दुकाने 


लग्नाला परवानगी 
आयुक्तांनी लग्न समारंभास परवानगी दिली. परंतु, लग्नात 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग राहणार नाही. अंत्यसंस्कारादरम्यान 20 नागरिक सहभागी होऊ शकतील, असेही महापालिकेने कळविले आहे. 

परवानगी नाही 
शहरातील उद्योग सुरू करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली नाही. केवळ बांधकाम सुरू करण्यास कंत्राटदारांना परवानगी आहे. परंतु, त्यांना मजुरांची व्यवस्था बांधकाम ठिकाणीच करावी लागणार आहे. 


नागपूर रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. नियम किती लवकर शिथिल करायचे ते आता नागरिकांनीच ठरवायचे आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे काटेकोर पालन करून शहरातील व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सहकार्य करा. 
- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT