Nmc demolished Sahil Syed's luxurious bungalow
Nmc demolished Sahil Syed's luxurious bungalow 
नागपूर

अनेकांना फसवून भूखंड व घरे हडप करणाऱ्याचा आलीशान तीन मजली बंगला बुलडोजर चालवून केला जमीनदोस्त...वाचा सविस्तर

राजेश चरपे

नागपूर : मंगळवारी झोन अंतर्गत झिंगाबाई टाकळी येथील बाबा फरीद नगर जवळील बगदादीया कॉलनी येथे साहिल सैय्यद खुर्शीद सय्यद याने तीन मजली इमारती उभी केली होती. सर्व्हे नंबर ८८, भूखंड क्र.२४४, २४५ वर अवैध कब्जा करून सुमारे ५०० वर्गमीटर जागेत बांधकाम केले होते.

 साहिलच्या घराचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याने मनपाच्या मंगळवारी झोनतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमचे कलम ५३ अंतर्गत अनधिकृत बांधकाम २४ तासात पाडण्यासाठी १० ऑगस्टला नोटीस देण्यात आली होती. दिलेला कालावधी संपल्यावरही बांधकाम पाडण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पालिकेने तीन बुलडोजर बांधकाम पाडण्यासाठी पाठवले. मनपाचे पथक पोहताच त्याच्या कुटुंबीयांनी नागरिकांना जमा करुन कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मानकापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली. त्यानंतर त्याच्या कुंटुंबीयांनी घरातील सामान काढणे सुरू केले. 

मनपा आयुक्त तकाराम मुंढे यांच्या आदेशावरून सहायक स्थापत्य अभियंता दीपक जांभुळकर, पी.के.गिरी, महेंद्र जनबंधु, प्रशांत सोनकुसरे, अतिक्रमण विभागाचे सुनील बावणे, बी.बी.माळवे, सुरेश डहाके यांच्यासह मंगळवारी झोनचे अतिक्रमण पथक, उपद्रव शोध पथकांनी उपरोक्त कारवाई केली. 

अनेकांना फसवून त्यांचे भूखंड व घरे हडप करणाऱ्या साहिल सय्यदच्या आलीशान तीन मजली बंगल्यावर महापालिकेने बुलडोजर चालवून तो जमीनदोस्त केला. कुठलाही तणाव निर्माण होऊ नये याकरीता पोलिस बंदोबस्त परिसरात लावण्यात आला होता. 

२८८ जणांना नोटीस 
सतरंजीपुरा बडी मशीद संस्थेच्या १६ एकर जागेवर येथील एकूण २८८ भूखंड टाकण्यात आले होते. त्याकरीता महापालिका, सुधार प्रन्यासची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. साध्या कागदावर लोकांना भूंखड विकण्यात आले. या लेआऊट मधील सर्वच बांधकाम अनधिकृत असून सर्वांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT