no cash in atm due to bank strike in nagpur 
नागपूर

एटीएमध्ये नाही कॅश, बँकांच्या संपाचा परिणाम; तब्बल साडेचार हजार कोटींचे व्यवहार ठप्प

राजेश रामपूरकर

नागपूर : देशभरात बँकांच्या खासगीकरणाविरोधात सलग दोन दिवस पुकारलेल्या संपामुळे धनादेश (चेक) वटण्यासह अन्य बँकींग व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे दोन दिवसात शहरातील साडे चार हजार कोटी, तर विदर्भातील साडेपाच हजार कोटीचे व्यवहार ठप्प झाले. या संपात सार्वजनिक क्षेत्रातील नऊ कामगार संघटनाचे साडेबारा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. बँकांचे विभागीय कार्यालय आणि शाखा कर्मचारी, अधिकाऱ्याविना दुसऱ्या दिवशीही ओस पडली होती. 

ग्राहकांना संपाची माहिती मिळावी म्हणून असोसिएशनने दर्शनी भागातच फलक लागली होती. तरीही काही ग्राहक बँकेमध्ये आले, त्यांना मात्र, आल्या पावली माघारी जावे लागले. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत किंग्जवेवरील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली, असे युनायटेड फोरमचे महासचिव जयवंत गुर्वे यांनी सांगितले. 

संपामुळे शहरातील अनेक एटीएमधील रोख रक्कम संपल्याने नो कॅशचे बोर्ड लागले होते. याशिवाय अनेक भागात कनेक्टिव्हीटी नसल्याने एटीएम बंद होती. परिणामी, ग्राहकांना पैसे काढण्यासाठी भटकंती करावी लागली. 

  • कर्मचारी संख्या १२,५०० 
  • बॅंक शाखा - १५०० 
  • उलाढाल दररोज - २२०० कोटी 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

SCROLL FOR NEXT